१४ जनावरांना जीवनदान

By Admin | Updated: April 1, 2016 01:49 IST2016-04-01T01:49:07+5:302016-04-01T01:49:07+5:30

तालुक्यातील तळोधी (मो.) परिसरातून जनावरांची खरेदी करून लखमापूर बोरीकडे घेऊन जाणारी १४ जनावरे ...

Lives of 14 animals | १४ जनावरांना जीवनदान

१४ जनावरांना जीवनदान

दोघांवर गुन्हा दाखल : चामोर्शीतील युवक व जयनगरातील नागरिकांची कारवाई
चामोर्शी : तालुक्यातील तळोधी (मो.) परिसरातून जनावरांची खरेदी करून लखमापूर बोरीकडे घेऊन जाणारी १४ जनावरे चामोर्शी येथील युवक व जयनगर येथील नागरिकांनी चामोर्शी येथील दिना नदीच्या नाल्यानजीक गुरूवारी सकाळच्या सुमारास पकडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
चामोर्शी शहरातील युवक व्यायाम करण्यासाठी गेले असता, १४ जनावरे कत्तलीसाठी पायी नेत असल्याचे दिसून आले. चामोर्शी येथील युवक व जयनगर येथील नागरिकांनी एकत्र येऊन बैल हाकलत नेणाऱ्यांची विचारपूस केली असता, त्यांनी पळ काढला. काही वेळानंतर बैलांचे खरेदीदार शेख कयुब शेख रशीद (३२), सलमान अजीज कुरेशी (१९) दोघेही रा. गोकुलनगर, गडचिरोली हे घटनास्थळावर पोहोचले. याबाबतची माहिती चामोर्शी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोघांच्याही विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
पकडलेली सर्व जनावरे गोरक्षण संस्था चंद्रपूर येथे रवाना करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार किरण अवचर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक लोणारकर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lives of 14 animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.