शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

बुद्ध धम्माच्या अष्टांग मार्गाने जीवन जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:52 AM

त्रिशरण, पंचशील यांच्यासोबतच बुद्धाच्या अष्टांग मार्गाचा स्वीकार करून जीवन जगावे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे सचिव राजरत्न आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे तथागत महोत्सव; त्रिशरण व पंचशील आत्मसात करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : त्रिशरण, पंचशील यांच्यासोबतच बुद्धाच्या अष्टांग मार्गाचा स्वीकार करून जीवन जगावे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे सचिव राजरत्न आंबेडकर यांनी केले.देसाईगंज येथील त्रिरत्न समता संघ सामाजिक बचतगट देसाईगंजच्या वतीने १८ व १९ फेब्रुवारी रोजी दीक्षाभूमीवर तथागत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमाला डॉ.युवराज मेश्राम, अ‍ॅड.सविता बेदरकर, कैलाश भेंगडे, डॉ.किशोर जीवने, बेनिराम कापगते, कविता मेश्राम, ममता जांभुळकर, विजय मेश्राम, इंदूताई पिपरे, चंद्रशेखर बांबोळे, अशोक इंदुरकर, प्रल्हाद कराडे, बौद्धकुमार लोणारे, सुनीता साळवे, आशा कापगते, प्रा.अनिल कानेकर, उद्धव रंगारी, प्रकाश बन्सोड, भास्कर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आंदोलनासोबतच बौद्ध धम्मावरही प्रकाश टाकला. महाड येथील चवदार तळे आंदोलन, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन यांची माहिती दिली.बौद्ध धम्माच्या अनुयायांनी त्रिशरण आणि पंचशील याशिवाय अष्टांगिक मार्गांचा अवलंब करून जीवन जगावे, याशिवाय बौद्धांचा उद्धार शक्य नाही. बौद्ध धम्माचे विचार समुद्राच्या खोलीप्रमाणे विस्तीर्ण आहेत. जसजसे आपण बौद्ध धम्माचा सविस्तर अभ्यास करू तसतसे नवनवीन बुद्ध तुम्हाला कळतील. समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दलित, पीडित, शोषित लोकांना धम्माच्या प्रवाहामध्ये त्यांनी आणले. देशामध्येच नव्हे तर जगामध्ये समता प्रस्तापित करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वत:चे जीवन वाहून घेतले. त्यामुळे त्यांना स्वत:च्या कुटुंबाकडे फारसे लक्ष देता आले नाही.१९५४ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. तीच महासभा आज जगातील बौद्ध राष्ट्रामध्ये काम करीत आहे. अ‍ॅड. सविता बेदरकर यांनी मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारावर प्रकाश टाकला.संचालन नैना दरडमारे, प्रास्ताविक त्रिरत्न समता संघाचे मुख्य प्रवर्तक विजय बन्सोड तर आभार अ‍ॅड.सोनाली मेश्राम यांनी मानले.७० महिलांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षागडचिरोली शहर व तालुक्यातील मादगी समाजाच्या जवळपास ७० महिलांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. भंते नंद यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. राजरत्न आंबेडकर यांनी नवबौद्धांकडून २२ प्रतीज्ञा वदवून घेतल्या. गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते धम्मराव तानादू यांच्या नेतृत्त्वात दीक्षा घेण्यात आली. दीक्षा घेणाºयांना बौद्ध आणि धम्म हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान गुणवंत व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमाला जवळपास पाच हजार नागरिक उपस्थित होते.रेस्टाहाऊस ते दीक्षाभूमीपर्यंत राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात रॅली काढण्यात आली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या धीम ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.