जनजागरण मेळाव्यात साहित्य वितरण

By Admin | Updated: September 28, 2016 02:34 IST2016-09-28T02:33:03+5:302016-09-28T02:34:13+5:30

भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनमध्ये रविवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

Literature distribution in the Janajagaran Melava | जनजागरण मेळाव्यात साहित्य वितरण

जनजागरण मेळाव्यात साहित्य वितरण

मार्गदर्शन : लाहेरी परिसरातील शेकडो नागरिकांची मेळाव्याला उपस्थिती
लाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनमध्ये रविवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान परिसरातील नागरिकांना दैनंदिन उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन प्रभारी अधिकारी सुधीर घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मोरे, ठाकूर, सरपंच पिंडा बोगामी, रमेश घोसरे, दिलीप तालापल्लीवार, रमेश पडालवार, कोमटी ओक्सा, वसंत घोसरे, बिसेन, मुख्याध्यापक उराडे आदी उपस्थित होते.
जनजागरण मेळाव्यादरम्यान नागरिकांना कपडे, युवकांना क्रिकेटचे साहित्य वितरित करण्यात आले. मेळाव्यादरम्यान डॉ. मेश्राम यांनी बालविवाह करू नये, दारूचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगून दारू सोडण्याचे आवाहन केले. लाहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुधीर घाडगे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. (वार्ताहर)

Web Title: Literature distribution in the Janajagaran Melava