सीआरपीएफतर्फे साहित्य वितरण
By Admin | Updated: February 19, 2017 01:16 IST2017-02-19T01:16:26+5:302017-02-19T01:16:26+5:30
तालुक्यातील बुर्गी येथील नागरिकांना सीआरपीएफ बटालियनच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

सीआरपीएफतर्फे साहित्य वितरण
बुर्गी येथे कार्यक्रम : विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप
एटापल्ली : तालुक्यातील बुर्गी येथील नागरिकांना सीआरपीएफ बटालियनच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर काही नागरिकांना स्वयंरोजगारासाठी कोंबड्या व त्यांचे खाद्य वितरित करण्यात आले.
भगवंतराव प्रायमरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य देण्यात आले. कम्युनिटी हॉलचेही उद्घाटन सीआरपीएफ बटालियनचे इन्स्पेक्टर हिरालाल मीना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीआरपीएफचे इतर अधिकारी जवान व स्थानिक नागरिक उपस्थित होते. या भागात रोजगाराची समस्या गंभीर असल्याने स्वयंरोजगार करता यावा, यासाठी सीआरपीएफच्या वतीने तरूणांना कोंबड्यांचे वितरण करण्यात आले. यामुळे युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यास फार मोठी मदत झाली आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना सीआरपीएफचे इन्स्पेक्टर हिरालाल मीना म्हणाले की, नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम सीआरपीएफचे जवान करीत आहेत. नक्षल्यांच्या भूलथापांना बळी न पडता, पालकांनी आपल्या पाल्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण द्यावे, शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घेऊन स्वत:चा विकास करावा, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सीआरपीएफचे जवान सदैव तयार असल्याचे मार्गदर्शन मीना यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीआरपीएफ जवानांनी सहकार्य केले.