नक्षलग्रस्त गडचिरोलीत सात हजार नागरिकांचे अहिंसा संदेशाचे श्रवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 16:57 IST2018-03-03T16:56:50+5:302018-03-03T16:57:04+5:30

नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत शनिवारी अहिंसेचा संदेश ग्रहण करण्यासाठी तब्बल ७०४१ विद्यार्थी व नागरिकांनी हजेरी लावून एका जागतिक विक्रमाला ओलांडले.

Listening to non-violence message of seven thousand citizens in Naxal-affected Gadchiroli | नक्षलग्रस्त गडचिरोलीत सात हजार नागरिकांचे अहिंसा संदेशाचे श्रवण

नक्षलग्रस्त गडचिरोलीत सात हजार नागरिकांचे अहिंसा संदेशाचे श्रवण

ठळक मुद्देतुर्कस्तानचा विश्वविक्रम ओलांडलागिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसकडून निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत शनिवारी अहिंसेचा संदेश ग्रहण करण्यासाठी तब्बल ७०४१ विद्यार्थी व नागरिकांनी हजेरी लावून एका जागतिक विक्रमाला ओलांडले. एका लेखकाच्या पुस्तकातील उतारा एकाचवेळी इतक्या लोकांनी श्रवण करण्याचा हा नवा जागतिक विक्र म ठरणार आहे. त्यासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या वतीने निरीक्षणही करण्यात आले.
यापूर्वी अशा प्रकारच्या श्रवणासाठी ५ हजार ७५० जणांची उपस्थिती नोंदविण्याचा विश्वविक्र म तुर्कस्तानच्या नावावर आहे.
सकाळी ९ वाजतापासून जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याच्या विविध भागातून विद्यार्थी व नागरिकांचा मैदानात प्रवेश सुरू झाला. दुपारी २ वाजता ७०४१ जणांची नोंदणी झाल्यानंतर पुण्याच्या आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांनी ‘गांधी विचार आणि अहिंसा’ या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन केले. तत्पूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही कार्यक्र मस्थळी येऊन या उपक्र माचे कौतुक केले. यातून शांततेचा संदेश नागरिकांपर्यंत जाईल, असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या रेकॉर्डचे निरीक्षण नोंदविण्यासाठी गिनीज बुकच्या वतीने कन्सलटंट मिलींद वेर्लेकर व त्यांची चमू उपस्थित होती. उपस्थितांच्या हातांवर बारकोड असलेले पट्टे बांधून उपस्थितीची नोंद डिजीटल पद्धतीने करण्यात आली. याशिवाय विविध अटींची पूर्तता करण्यात आली असून विविध कॅमेऱ्यांनी टिपलेल्या निरीक्षणांचा अभ्यास व अटींची पूर्तता तपासल्यानंतर २० दिवसांनी विश्वविक्र माबाबतची अधिकृत घोषणा होईल, असे वेर्लेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्हा पोलीस दल, आदर्श मित्र मंडळ, उडान फाऊंडेशन, लक्ष्मीनृसिंग पतसंस्था आदींच्या पुढाकारातून या कार्यक्र माचे आयोजन केले होते.

Web Title: Listening to non-violence message of seven thousand citizens in Naxal-affected Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.