शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

दारुविक्रेत्यास तीन वर्षे सश्रम कारावास, २५ हजार दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 18:59 IST

तापस दिनेश मल्लीक (रा.नवग्राम ता.चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. २३ ऑक्टोबर २०२० रोजी तो स्वत:च्या घरी   मोह फुलाची दारु विक्री करीत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरुन चामोर्शी पोलिसांनी धाड टाकली.

गडचिरोली : जिल्ह्यात बंदी असतानाही दारुची तस्करी करणाऱ्या आरोपीला चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी. मेश्राम यांनी १२ एप्रिल रोजी तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.तापस दिनेश मल्लीक (रा.नवग्राम ता.चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. २३ ऑक्टोबर २०२० रोजी तो स्वत:च्या घरी   मोह फुलाची दारु विक्री करीत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरुन चामोर्शी पोलिसांनी धाड टाकली.  घराच्या स्वयंपाक खोलीमध्ये अवैध रित्या दहा लिटर मोह फुलांची दारु मिळून आल्याने   चामोर्शी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.  हवालदार आर. डी. पिल्लेवान यांनी तपास करुन प्रथमवर्ग न्यायालयात आरोपीविरुद्ध कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम अन्वये दोषारोपपत्र  सादर केले.

फिर्यादी व ईतर साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद  ऐकल्यानंतर  तापस दिनेश मल्लीक याला दोषी ठरविण्यात आले. त्यास तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  सरकारी अभियोक्ता  एस. एम. सलामे यांनी  युक्तिवाद केला. अंमलदार टी. आर. भोगाडे यांनी   कोर्ट पैरवी म्हणून त्यांना सहाय्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदीCourtन्यायालय