सालमारा येथे तीन वर्षांनंतर पुन्हा दारूविक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:31+5:302021-05-27T04:38:31+5:30
सालमारा येते तीन वर्षांपूर्वी गावकऱ्यांच्या पुढाकाराने येथील अवैध दारू विक्री बंद करून गावात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न ...

सालमारा येथे तीन वर्षांनंतर पुन्हा दारूविक्री सुरू
सालमारा येते तीन वर्षांपूर्वी गावकऱ्यांच्या पुढाकाराने येथील अवैध दारू विक्री बंद करून गावात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सदर प्रयत्न काही कालावधीसाठी यशस्वीदेखील झाले. मात्र निवडणुकीमुळे गावामध्ये राजकीय वातावरण तापले. गावामध्ये ऐक्य राहिले नाही. गाव पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोह फुलाची दारू मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. परिसरातील गाव आणि शहरातील शौकिनांचे लोंढे गावाकडे येत आहेत. गावातील काही सुजाण नागरिकांनी बाहेरचे कोणी येऊ नये म्हणून गावात येणाऱ्या मुख्य मार्गावर आडकाठी आणली. परंतु अवैध दारू विक्रेते गावकऱ्यांच्या आवाहनाला जुमानले नाही. दारूविक्रीचा त्रास गावातील पुरुषांसह महिलांना सर्वाधिक हाेत आहे. याप्रकाराकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्याने विक्रेत्यांचे फावले आहे. ही अवैध दारूविक्री बंद करावी, अशी मागणी सालमारावासीयांनी केली आहे.