लायन्स क्लबची नवीन कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST2021-05-31T04:26:45+5:302021-05-31T04:26:45+5:30

कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदी महेश बोरेवार, तर प्रथमच उपाध्यक्ष म्हणून सतीश पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष प्रा. ...

Lions Club formed a new executive | लायन्स क्लबची नवीन कार्यकारिणी गठित

लायन्स क्लबची नवीन कार्यकारिणी गठित

कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदी महेश बोरेवार, तर प्रथमच उपाध्यक्ष म्हणून सतीश पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष प्रा. संध्या येलेकर यांच्या कार्यकारिणीने मागील वर्षात राबवलेले उपक्रम तसेच काही नवीन नावीन्यपूर्ण उपक्रम नवनियुक्त अध्यक्ष परवीन भामाणी यांनी यावर्षी राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. नवीन कार्यकारिणी घाेषित झाल्याबद्दल लायन्स क्लबचे संस्थापक-अध्यक्ष बाळासाहेब पद्मावार, माजी अध्यक्ष प्रा. संध्या येलेकर, घिसुलाल काबरा, विनय ढोले, भुजंग हिरे, नादिर भामानी, डॉ. राजाभाऊ मुनघाटे, सुरेश लडके, प्रा. शेषराव येलेकर, गिरीश कुकुडपवार, शेमदेव चाफले, शांतिलाल सेता, प्रवीण मिर्गे, मदत जीवानी, डॉ. अरुण प्रकाश, दीपक मोरे, प्रभू सादमवार, रहीम डोलिया, संजय बारापात्रे, प्रा. संजय भांडारकर, प्रा. देवानंद कामडी, छाया पद्मावार, स्मिता लडके, नवीन उनाडकाट, सुनील देशमुख, सुचिता कामडी, सविता सादमवार, मनोज ठाकूर, महेश काबरा, योगानंद उईके, शालिनी कुमरे, किशोर चिलमवार आदींनी आनंद व्यक्त केला.

Web Title: Lions Club formed a new executive