लिंक फेलचा ग्राहकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:18 IST2017-09-18T23:18:05+5:302017-09-18T23:18:20+5:30
येथील भारतीय स्टेट बँकेचे सोमवारी लिंक फेल झाल्याने आर्थिक व्यवहारांसाठी बँकेत आलेल्या शेकडो ग्राहकांना आर्थिक व्यवहार न करताच परतावे लागले.

लिंक फेलचा ग्राहकांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : येथील भारतीय स्टेट बँकेचे सोमवारी लिंक फेल झाल्याने आर्थिक व्यवहारांसाठी बँकेत आलेल्या शेकडो ग्राहकांना आर्थिक व्यवहार न करताच परतावे लागले.
धानोरा तालुक्यातील बहुतांश नागरिकांचे बँक खाते भारतीय स्टेट बँकेत आहेत. त्यामुळे या बँकेत नागरिकांची नेहमीच गर्दी राहते. सध्या ग्रामीण भागात शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी बँकेतील पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करीत आहेत. सोमवारी सकाळपासूनच बँकेत गर्दी होती. मात्र बँक सुरू झाल्यापासूनच लिंक फेल असल्याचे येथील कर्मचारी सांगत होते. काही वेळानंतर लिंक येईल या आशेने ग्राहक थांबले होते. मात्र १२ ते १ वाजूनही लिंक सुरू न झाल्याने अनेक ग्राहकांनी घराकडचा रस्ता धरला. दुपारी २ वाजता लिंक सुरळीत झाली. मात्र तोपर्यंत अनेक ग्राहक घराकडे परतले होते. मागील १५ दिवसांपासून बँकेत लिंक फेल होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. याबाबत बँकेचे व्यवस्थापक यांना विचारणा केली असता, लिंक फेलबाबत नागपूर येथील कार्यालयात कळविण्यात आले. मात्र अजुनही समस्या सुटली नसल्याचे सांगितले.
संपूर्ण धानोरा तालुक्यातील वीज पुरवठा रविवारच्या रात्री खंडीत झाला होता. त्यामुळे तालुक्यातील जवळपास २०० गावे अंधारात सापडली होती.