दुर्गम भागात वीज पोेहोचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:45 IST2017-09-04T22:45:16+5:302017-09-04T22:45:32+5:30
परिसरातील ज्या गावांमध्ये अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा गावांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी वीज विभाग प्रयत्न करेल,

दुर्गम भागात वीज पोेहोचणार
लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : परिसरातील ज्या गावांमध्ये अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा गावांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी वीज विभाग प्रयत्न करेल, असे आश्वासन लाहेरीचे प्रभारी अधिकारी गजानन पडळकर यांनी केले.
लाहेरी पोलीस स्टेशनच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन सीआरपीएफचे अधिकारी अमित यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून लाहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गजानन पडळकर, सरपंच पिंगा बोगामी, डॉ. सिडाम, लक्ष्मीकांत बोगामी, चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मेळाव्याला होडरी, गुंडेश्वर, बंगाडी, कुक्कामेठा, मलमपाडर आदी गावातील नागरिक उपस्थित होते.
होडरी, लस्कर, गोपनार या गावांना अजूनपर्यंत वीज पुरवठा झाली नसल्याची बाब मेळाव्यादरम्यान नागरिकांनी पोलीस विभागाच्या लक्षात आणून दिली. या गावांना वीज पुरवठा करण्याचे आश्वासन पडळकर यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार निमसरकार यांनी मानले.