शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

न.प.च्या दिव्यांमधून भ्रष्टाचाराचा उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:11 IST

नगरोत्थान जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या देसाईगंज शहरातील चार रस्त्यांवरील विद्युतीकरण कामात नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देदेसाईगंजमध्ये विद्युतीकरण घोटाळा : अनेक जण दोषी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगरोत्थान जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या देसाईगंज शहरातील चार रस्त्यांवरील विद्युतीकरण कामात नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामासाठी १ कोटी ९९ लाख ७८ हजार रुपयांच्या रकमेला मुख्य अभियंता (तांत्रिक), सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून तांत्रिक मान्यता मिळाली होती. मात्र खांबांच्या उभारणीपासून तर दिवे लावण्यापर्यंत सर्वच ठिकाणी घोळ झाल्याचे समोर आले आहे.देसाईगंज नगर परिषदेने सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार ८ आॅगस्ट २०१३ रोजी प्रभाग क्रमांक १ ते ४ मध्ये राज्य व राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजक एलईडी लाईट फिटींगसह विद्युत खांब उभारणीच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली होती. जिल्हा नियोजन समितीत ६ सप्टेंबर २०१४ रोजी सदर कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतू या कामात अनेक प्रकारच्या अनियमितता आढळल्या आहेत. या कामातील विविध बाबींची तपासणी करण्याकरिता उपप्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्यांनी ६ डिसेंबर २०१७ रोजी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. त्यात काम न करताच कंत्राटदारास देयकांची रक्कम प्रदान करणे, तांत्रिक मंजुरीनुसार फिलीप्स कंपनीऐवजी दुसऱ्याच कंपनीचे दिवे लावणे असे अनेक प्रकार समोर आले.अनेकांनी केल्या होत्या तक्रारीया कामात गैरव्यवहार झाल्याबाबतच्या तक्रारी खासदार अशोक नेते, भंडारा-गोंदियाचे तत्कालीन खासदार नाना पटोले, देसाईगंजच्या तत्कालीन नगरसेविका कल्पना माडावार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष यशवंत नाकतोडे आदींनी केल्या होत्या. त्या तक्रारींसह लोकमतमध्ये आलेल्या बातम्यांची दखल घेत चौकशी करण्यात आली.आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास होणार का?या प्रकरणात कंत्राटदार-पुरवठादार सोम इलेक्ट्रीकल्स यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी विनोद जाधव हेसुद्धा दोषी आढळले आहेत. याशिवाय नगर परिषदेतील इतर अधिकारी व कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय सदर प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणे आवश्यक असल्याचे चौकशी समितीचे सूचविले आहे.