आमटे दाम्पत्याला लाईफटाईम अवॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:32 IST2017-12-12T23:32:02+5:302017-12-12T23:32:25+5:30
कोलकाता येथे आयोजित तिसऱ्या कोलकाता आंतरराष्ट्रीय वन्यजीव आणि पर्यावरण चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश व मंदाकिनी आमटे या दाम्पत्याला लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे.

आमटे दाम्पत्याला लाईफटाईम अवॉर्ड
ठळक मुद्देवन्यजीव चित्रपट महोत्सवात होणार सन्मान
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : कोलकाता येथे आयोजित तिसऱ्या कोलकाता आंतरराष्ट्रीय वन्यजीव आणि पर्यावरण चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश व मंदाकिनी आमटे या दाम्पत्याला लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे.
येत्या १५ ते १७ डिसेंबरदरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार आहे. त्यात ११६ देशांमधील २३०० चित्रपटांची नोंदणी झाली आहे. या महोत्सवात निसर्ग आणि वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या देश-विदेशातील व्यक्तींना गोल्डन टायगर अवॉर्ड देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यात महोत्सव समितीने लाईफटाईन अचिव्हमेंट अवॉर्डसाठी आमटे दाम्पत्याची निवड केली आहे.