जीवनमूल्य व कौशल्य अंगिकारा

By Admin | Updated: February 7, 2015 23:25 IST2015-02-07T23:25:00+5:302015-02-07T23:25:00+5:30

विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने अध्ययनशील असावे, प्रत्येकांनी अभ्यास करून आपल्या जीवनात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शारीरिक व मानसिक क्षमता उंचावून स्वप्न

Life Value and Skills | जीवनमूल्य व कौशल्य अंगिकारा

जीवनमूल्य व कौशल्य अंगिकारा

गडचिरोली : विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने अध्ययनशील असावे, प्रत्येकांनी अभ्यास करून आपल्या जीवनात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शारीरिक व मानसिक क्षमता उंचावून स्वप्न पूर्तीसाठी जीवनमूल्य व कौशल्यांचा अंगिकार करावा, असे आवाहन वर्धा येथील दत्ता मेघे आरोग्य विज्ञान संस्थेचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थी परिषद २०१४- १५ च्या पदग्रहण समारंभ मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. विजय वडेट्टीवार, प्रा. डॉ. अरूण पाटील उपस्थित होते.
आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक आहे. युवापिढी देशाचे भवितव्य बदलवू शकते. ती ताकद युवकांमध्ये आहे. युवकांनी राजकारण, समाजकारण, समाजपरिवर्तन करावे, यातून समाज परिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन विजय वडेट्टीवार यांनी केले.
विद्यार्थी हा अध्ययनप्रिय असावा, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. ज्या शिक्षणाने आपण चारित्र्यवान बनू तेच खरे शिक्षण. जीवनाचे सर्वाेच्च ध्येय सत्य आहे. संयम हे जीवनाच्या नौकेचे सुकाणू आहे. लोभातूनच सर्व दुष्कर्म जन्म घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनातील पैलू समजून घ्यावे, असे आवाहन डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. मोहुर्ले तर आभार कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Life Value and Skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.