कर्मचाºयांच्या समस्या मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:53 IST2017-08-25T23:52:35+5:302017-08-25T23:53:58+5:30

जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हाभरात कार्यरत आरोग्य कर्मचाºयांच्या स्थानिक पातळीवरील समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार, ......

 Let's solve the problem of employees | कर्मचाºयांच्या समस्या मार्गी लावू

कर्मचाºयांच्या समस्या मार्गी लावू

ठळक मुद्देसंघटनेचे शिष्टमंडळ भेटले : डीएचओ शंभरकर यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हाभरात कार्यरत आरोग्य कर्मचाºयांच्या स्थानिक पातळीवरील समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही जिल्हा परिषदेत नुकतेच रूजू झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी आरोग्य कर्मचाºयांच्या शिष्टमंडळाला दिली.
महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाºयांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंभरकर यांची त्यांच्या कक्षात जाऊन गुरूवारी भेट घेतली. यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. सुनील मडावी उपस्थित होते.
कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंभरकर व माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील मडावी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आरोग्य कर्मचाºयांच्या विविध सेवाविषयक व वेतन, भत्त्यांच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक चौधरी, कमलेश झाडे, मधुकर बोडुवार, अशोक देवगडे, पंकज लिंगायत, मंदावार, नेताजी मेश्राम, हिराजी गेडाम, प्रशांत खोब्रागडे, नरेंद्र कुनघाडकर, मोहन वाटगुरे, मारशेट्टीवार, भांडेकर हजर होते.

Web Title:  Let's solve the problem of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.