विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे
By Admin | Updated: January 10, 2016 01:45 IST2016-01-10T01:45:45+5:302016-01-10T01:45:45+5:30
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी, ...

विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे
मार्गदर्शन : वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन
आरमोरी : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने आरमोरी येथील पॅराडाईज इंग्लिश मीडिअम स्कूल येथे शुक्रवारी वाहतूक नियमांवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरिक्षक सुभाष ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष गोविंदराज कवंडर, विभाग प्रमुख विजयालक्ष्मी कवंडर, मुख्याध्यापक केशवन कवंडर, निरीक्षिका किरण नेऊलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघात टाळणे शक्य आहे. आजची पिढी अतिशय संवेदनशील असून वाहनांच्या वेगावर नियंत्रण बाळगत नाही. तसेच वाहन चालविताना मोबाईल बोलणे, रस्त्याच्या कडेला ग्रुप करून बोलणे, स्टंट मारणे आदी बांबींमुळे अपघाताचे प्रमाण वाढते, असे मार्गदर्शन केले. संचालन सुजाता मेहर, तर आभार मिनाज शेख यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)