उपक्रम व खेळातून मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:43+5:302021-06-29T04:24:43+5:30

मागील वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका असल्याने संपूर्ण शाळा-महाविद्यालये बंद आहेत. प्राथमिक शाळेतील मुले घरातच बंदिस्त आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ...

Lessons for personality development in children through activities and sports | उपक्रम व खेळातून मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

उपक्रम व खेळातून मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

मागील वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका असल्याने संपूर्ण शाळा-महाविद्यालये बंद आहेत. प्राथमिक शाळेतील मुले घरातच बंदिस्त आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी धमाल, सहली, खेळ यामध्ये बराच खंड पडला. ही स्थिती लक्षात घेऊन मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. यात दररोज बालगीते, बोधकथा, चित्रकला स्पर्धा, शब्द देऊन कविता आणि क्राफ्ट बनविणे, शब्द देऊन कथा तयार करून सांगणे, थोर व्यक्तीचे चरित्र वाचन, संत व महात्मा यांची वेशभूषा साकारून त्यांचे विचार मांडणे आदी उपक्रम राबविण्यात आले.

विशेष बाब म्हणजे, पालकांनीही या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला. शिबिरासाठी सिरोंचा तालुक्यातील केंद्र प्रमुख शेख, चामोर्शी येथील केंद्र प्रमुख रामभाऊ सातपुते, शिक्षक अनिल मार्तीवार, मूलचेरा येथील मुख्याध्यापक दादा पुण्यमूर्तीवार व कैवल्या एज्युकेशन फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

बाॅक्स

पुढील महिन्यातही विविध उपक्रम

पुढील महिन्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम १,१०० रुपये, द्वितीय ५०१ रुपये, तृतीय २५१ रुपये आदी पारितोषिक व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Lessons for personality development in children through activities and sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.