हळद व आर्द्रक लागवडीचे शेतकऱ्यांनी घेतले धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:56+5:302021-06-22T04:24:56+5:30
गडचिराेली : कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यमाने चामाेर्शी तालुक्याच्या ...

हळद व आर्द्रक लागवडीचे शेतकऱ्यांनी घेतले धडे
गडचिराेली : कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यमाने चामाेर्शी तालुक्याच्या आमगाव येथील शेतात हळद व आर्द्रक लागवडीचे प्रात्यक्षिक करून २१ जून राेजी साेमवारी कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. डाॅ. देवराव हाेळी, पंचायत समिती सदस्य नरेश नराेटे, गडचिराेलीचे उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, विषय विशेषज्ञ नरेश बुद्धेवार, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, कृषी सहायक श्रीनिवास रनमले, कृषी हवामान निरीक्षक माेहितकुमार गणवीर आदी उपस्थित हाेते.
याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध याेजना व प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली.
विषय विशेषज्ञ नरेश बुद्धेवार यांनी हळद व आले यांच्या बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रत्यक्ष लागवड करून तंत्रज्ञानाची माहिती दिली. प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत तूर बियाणांचे कृषिनिविष्ठा स्वरूपात शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला आमगाव येथील शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
बाॅक्स...
भाजीपाला पिकातून आर्थिकस्तर वाढवा : आ.डाॅ. हाेळी
- चामाेर्शी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील केवळ धानपिकावरच अवलंबून राहू नये. खरीप, रब्बी धान लागवडीसाेबतच भाजीपाला व मसाला पिकाची लागवड करावी. हळद, आर्द्रक व इतर प्रकारच्या भाजीपाला पीक लागवडीतून आपला आर्थिकस्तर उंचवावा, असे आवाहन आ.डाॅ. देवराव हाेळी यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांना केले.
- चामाेर्शी तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या माेठी आहे. मात्र या तालुक्यातील शेतकरी धानपिकाकडे अधिक लक्ष देतात. आता चिचडाेह बॅरेज, रेगडी येथील कन्नमवार जलाशय याच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा आहे. या सिंचन सुविधेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी बारमाही पिके घेतली पाहिजे, असे आ.डाॅ. देवराव हाेळी यांनी सांगितले.