सेतू अभ्यासक्रमाचे मुख्याध्यापक व शिक्षकांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:37 IST2021-07-31T04:37:14+5:302021-07-31T04:37:14+5:30
प्रमुख अतिथी म्हणून उच्चश्रेणी मुख्याध्यापक गोपाल खेवले, राजू आत्राम, विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे, राजू नागरे, पदवीधर शिक्षिका लक्ष्मी ...

सेतू अभ्यासक्रमाचे मुख्याध्यापक व शिक्षकांना धडे
प्रमुख अतिथी म्हणून उच्चश्रेणी मुख्याध्यापक गोपाल खेवले, राजू आत्राम, विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे, राजू नागरे, पदवीधर शिक्षिका लक्ष्मी कुसराम, प्रकाश दुर्गे उपस्थित होते. शिक्षण परिषदेत प्रामुख्याने ‘सेतू अभ्यासक्रम व त्याची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर साधन व्यक्ती सुषमा खराबे यांनी मार्गदर्शन केले. सेतू अभ्यासक्रमाची गरज व यात शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची भूमिका याबाबत प्रकाश दुर्गे यांनी मार्गदर्शन केले, तर सेतू अभ्यासक्रमाचे मूल्यमापन व नोंद याबाबत विशेष तज्ज्ञ राजू नागरे यांनी मार्गदर्शन केले. सेतू अभ्यासक्रम राबविताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय तसेच शिक्षकांच्या शंकांचे समाधान केंद्र प्रमुख प्रफुल्ल मंडल यांनी केले.
हा अभ्यासक्रम प्रत्येक शाळेत शिक्षकांनी घटक संच व डायट प्राचार्य यांनी तयार केलेल्या व्हिडिओचा सखोल अभ्यास करून शाळेत त्याची प्रकर्षाने अंमलबजावणी करावी, असे आवाहन केंद्र प्रमुख प्रफुल्ल मंडल यांनी केले. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजू आत्राम, संचालन शिक्षिका शैलजा गोरेकर यांनी केले. आभार संतू नलगुंठा यांनी मानले.
300721\img-20210730-wa0104.jpg
शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख प्रफुल्ल मंडल सह इतर मान्यवर