विद्यार्थिनींना मिळणार सशक्तीकरणाचे धडे

By Admin | Updated: December 30, 2014 23:34 IST2014-12-30T23:34:19+5:302014-12-30T23:34:19+5:30

विद्यार्थिनींवर होणारे हल्ले थांबविण्याबरोबरच विद्यार्थिनींना आत्मरक्षण करता यावे, यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे सशक्तीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला असून याचा

Lessons of empowerment will be given to the students | विद्यार्थिनींना मिळणार सशक्तीकरणाचे धडे

विद्यार्थिनींना मिळणार सशक्तीकरणाचे धडे

गडचिरोली : विद्यार्थिनींवर होणारे हल्ले थांबविण्याबरोबरच विद्यार्थिनींना आत्मरक्षण करता यावे, यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे सशक्तीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला असून याचा लाभ जवळपास १० हजार विद्यार्थिनींना होणार आहे.
विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थिनींना औपचारिक शिक्षण दिले जाते. मात्र हे शिक्षण अडीअडचणीच्या वेळी कामात येईल, याची शाश्वती नाही. मागील काही दिवसांपासून महिलांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र या हल्ल्यांचा सामना युवती प्रभावीपणे करू शकत नाही. हे हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यासाठी विद्यार्थिनींचे सशक्तीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी भारत जैन संघटना या स्वयंसेवी संघटनेने स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. या स्वयंसेवी संघटनेचे स्वयंसेवक विद्यापीठातील विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे देणार आहेत. विशेष म्हणजे भारत जैन संघटनेने हा उपक्रम नि:शुल्क स्वरूपात विद्यापीठाला उपलब्ध करून दिला आहे.
गडचिरोली, चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे २३ ते २५ जानेवारी या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात महाविद्यालयातील जवळपास ५० विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार आहेत. विद्यापीठांतर्गत सुमारे २३० महाविद्यालय असून यामध्ये जवळपास १० हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. प्रशिक्षणाचा लाभ सर्व विद्यार्थिनींना देण्याचा संकल्प गोंडवाणा विद्यापीठाने केला आहे. सदर प्रशिक्षण जीवनभर उपयोगी पडणार आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Lessons of empowerment will be given to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.