रेगडीत मिळणार ई-लर्निंगचे धडे
By Admin | Updated: January 21, 2017 01:57 IST2017-01-21T01:57:50+5:302017-01-21T01:57:50+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग बदलत असताना दुर्गम भागातीलही शाळा तांत्रिकदृष्ट्या प्रगत व्हाव्यात तसेच अध्ययन, अध्यापन प्रभावी व्हावे,

रेगडीत मिळणार ई-लर्निंगचे धडे
डिजिटल शाळा : पोलीस प्रशासन व आदर्श मित्र मंडळाचा पुढाकार
चामोर्शी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग बदलत असताना दुर्गम भागातीलही शाळा तांत्रिकदृष्ट्या प्रगत व्हाव्यात तसेच अध्ययन, अध्यापन प्रभावी व्हावे, या हेतूने जिल्हा पोलीस विभाग व पुणे येथील आदर्श मित्र मंडळाच्या वतीने रेगडी येथे ज्ञानगंगा प्रोजेक्ट अंतर्गत ई- लर्निंग कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे मिळणार आहेत.
रेगडी येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे होते. प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, अॅड. कल्याण शिंदे, नवनीत देशपांडे, अभिजीत सोनवने, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राजपुत, किशोर मेढे, पवन इंगळे, बिराजदार, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका महल्ले, मंडल साखरे उपस्थित होते. कार्यक्रमात देशपांडे यांनी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांना ई-लर्निंगबाबत मार्गदर्शन करून त्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर ई- लर्निंगचे संपूर्ण उपकरण संबंधित मुख्याध्यापकांना अतिथींच्या हस्ते अधिग्रहित करण्यात आले. नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन प्रगती साधावी, तसेच जिल्हा विकासात हातभार लावावे, असे आवाहन डॉ. सागर कवडे यांनी केले. आभार पीएसआय बांगर यांनी मानले.