पूलखलातील काेंबड्यांवर बिबट्याचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:01 IST2021-12-24T05:00:00+5:302021-12-24T05:01:04+5:30

पूलखल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट व वाघाचे दर्शन हाेत आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूलखल येथील कासुबाई पेंदाम यांचा काेंबडा बिबट्याने पळविला. विशेष म्हणजे, फार रात्र झाली नव्हती. तरीही बिबट्याने गावात प्रवेश करून काेंबडा पळविला. काही दिवसांपूर्वी धर्मराव ठाकरे यांच्या शेळीच्या पिल्लावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. 

A leopard's nest on a pole in the pool | पूलखलातील काेंबड्यांवर बिबट्याचा डल्ला

पूलखलातील काेंबड्यांवर बिबट्याचा डल्ला

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : तालुक्यातील पूलखल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे. गावातील नागरिकांच्या घरातील काेंबड्यांवर बिबट डल्ला मारत आहे. एखाद्या दिवशी नागरिकांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
पूलखल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट व वाघाचे दर्शन हाेत आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूलखल येथील कासुबाई पेंदाम यांचा काेंबडा बिबट्याने पळविला. विशेष म्हणजे, फार रात्र झाली नव्हती. तरीही बिबट्याने गावात प्रवेश करून काेंबडा पळविला. काही दिवसांपूर्वी धर्मराव ठाकरे यांच्या शेळीच्या पिल्लावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. 
ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचे शाैचालय व स्वच्छतागृह घराच्या बाहेर राहतात. त्यामुळे रात्री लघुशंकेसाठी घराच्या बाहेर निघावेच लागते. अशातच बिबट्याचा हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठ दिवसांपूर्वी पूलखल येथील शेतशिवारात वाघ दिसून आला. वाघ दिसताच बैलांनी पळ काढला. शेतकरीसुद्धा बचावला. वाघ व बिबट्यांमुळे पूलखल येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वन विभागाने त्यांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.

बंदाेबस्त करण्याची मागणी
बिबट्याचे गावात येण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माणसावरही हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पुलखल येथील शेतकरी व नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदाेलनाचा इशारा दिला आहे. 

Web Title: A leopard's nest on a pole in the pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.