बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या व बोकड ठार
By Admin | Updated: October 22, 2015 02:05 IST2015-10-22T02:05:11+5:302015-10-22T02:05:11+5:30
बिबट्याने गोठ्यात असलेल्या शेळ्यांच्या कळपावर खिडकीतून प्रवेश करून हल्ला केल्याने या हल्ल्यात पाच शेळ्या व

बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या व बोकड ठार
मालेवाडा : बिबट्याने गोठ्यात असलेल्या शेळ्यांच्या कळपावर खिडकीतून प्रवेश करून हल्ला केल्याने या हल्ल्यात पाच शेळ्या व एक बोकड ठार झाल्याची घटना १९ आॅक्टोबरच्या रात्री सावरगाव टोला येथे घडली.
कुरखेडा तालुक्यातील बांधगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावरगाव टोला या गावाला चारही बाजुने घनदाट जंगल व डोंगराचा वेढा आहे. येथे नेहमीच हिंस्त्र पशुंचा वावर राहतो. गावाच्या सीमेवर साईनाथ मतरू वट्टी या वृध्द शेतकऱ्याचे घर आहे. घरातच हा शेतकरी शेळीपालनाचा व्यवसाय करतो. १९ च्या रात्री २ वाजतानंतर बिबट्याने गोठ्याला असलेल्या खिडकीतून प्रवेश केला व तेथे असलेल्या पाच शेळ्या व एक बोकडला ठार केले. त्यानंतर तेथून त्याने पलायन केले. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वनक्षेत्र सहायक डब्ल्यू. एस. शेंडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शेतकऱ्यांचे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या भागात मादी बिबट्याचे पिल्लू वावरत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)