बिबट्याचा मुलावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:36 IST2021-09-13T04:36:06+5:302021-09-13T04:36:06+5:30

अंश मनोज मोरे (८), रा. पेेपर काॅलनी आष्टी असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. अंश हा गणपतीच्या आरतीसाठी काॅलनीमधून ...

Leopard attack on a child | बिबट्याचा मुलावर हल्ला

बिबट्याचा मुलावर हल्ला

अंश मनोज मोरे (८), रा. पेेपर काॅलनी आष्टी असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. अंश हा गणपतीच्या आरतीसाठी काॅलनीमधून पेपरमिलमध्ये एकटाच येत हाेता. याच ठिकाणी लपून बसलेल्या बिबट्याने अंशवर हल्ला केला. त्याच्या हाताला चावा घेतला. दाेन ठिकाणी दात रुतल्याने जखम झाली आहे. अंशवर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येतााच जवळच असलेला सिक्युरिटी गार्ड परवेश सिंग याने बिबट्याला दंड्याने मारून हुसकावून लावले.

अंशला ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पेपरमिलच्या मागे असलेल्या झुडपांमध्ये बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे ताे काॅलनीतील अनेक कर्मचाऱ्यांना दिसून आला आहे. काही दिवसांपूर्वी एका वासराला ठार केले होते. आजपर्यंत अनेक बकऱ्या व कोंबड्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. मात्र, बिबट्याचा बंदाेबस्त करण्याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे.

Web Title: Leopard attack on a child