आमदारांनी घेतला मार्र्कंडा यात्रेच्या तयारीचा आढावा

By Admin | Updated: March 4, 2016 01:20 IST2016-03-04T01:20:01+5:302016-03-04T01:20:01+5:30

महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्च सोमवारपासून भरणाऱ्या मार्र्कंडा तिर्थस्थळावरील यात्रा सुरळीत व सुव्यवस्थित पार पडावी म्हणून सर्व प्रशासकीय...

Legislators took a review of the preparations for the Marrakonda pilgrimage | आमदारांनी घेतला मार्र्कंडा यात्रेच्या तयारीचा आढावा

आमदारांनी घेतला मार्र्कंडा यात्रेच्या तयारीचा आढावा

यंत्रणा सज्ज : ग्रामपंचायतीला १ लाख १७ हजारांचा निधी प्राप्त
चामोर्शी : महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्च सोमवारपासून भरणाऱ्या मार्र्कंडा तिर्थस्थळावरील यात्रा सुरळीत व सुव्यवस्थित पार पडावी म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणेची आढावा बैठक आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शीच्या उपविभागीय कार्यालयात गुरूवारी घेतली.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, तहसीलदार यू. जी. वैद्य, नायब तहसीलदार देवेंद्र दहीकर, चडगुलवार, बांधकाम विभागाचे उपअभियंता गावळ, जि.प. बांधकाम विभागाचे वझरकर, कुमरे, संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी, एसटी विभागाचे चौधरी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रेड्डी, वन विभागातर्फे नरखेडकर, पेंपकवार, मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, रामेश्वर सेलुकर, स्वप्नील वरघंटे, दिलीप चलाख, जयराम चलाख आदी उपस्थित होते.
मार्र्कंडा ग्रामपंचायतीला १ लाख १७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. मार्र्कंडा यात्रेसाठी ३५० पोलीस व दीडशे गृहरक्षक असा एकूण ५०० जणांची सुरक्षा व्यवस्था राहणार असल्याचे पोलीस निरिक्षक किरण अवचार यांनी बैठकीत सांगितले. यात्रेसाठी ३६ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून मूल, गडचिरोली, आष्टी, चंद्रपूरसह इतरही मार्गावरून भाविकांची वाहतूक करण्यात येणार असल्याचे या बैठकीत एसटी विभागाचे चौधरी यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, विद्युत, आरोग्य, वन विभागाच्या प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या तयारीचा आढावा आमदारांपुढे ठेवला. पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे असलेल्या तयारीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मार्र्कंडा यात्रेत महिला प्रसाधन गृहाची व्यवस्था, महिला बचत गट मार्र्कंडाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे नियोजन बैठकीत मांडण्यात आले. भाविकांनी सर्व सोयीसुविधांचा लाभ घेऊन यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन सर्व विभाग प्रमुखांनी केले आहे. यात्रा काळात सर्व सोयी दिल्या जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Legislators took a review of the preparations for the Marrakonda pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.