आमदारांनी जाणल्या समस्या

By Admin | Updated: August 11, 2016 01:33 IST2016-08-11T01:33:22+5:302016-08-11T01:33:22+5:30

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन...

Legislators know the problem | आमदारांनी जाणल्या समस्या

आमदारांनी जाणल्या समस्या

उपजिल्हा रुग्णालयाला दिली भेट : अधिपरिचारिकांशी चर्चा
आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या व सदर समस्या मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर आपण प्रयत्न करणार, असे आश्वासन आ. क्रिष्णा गजबे यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिकांनी आ. गजबे यांच्याशी चर्चा केली व त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिकांची १२ पदे मंजूर आहेत. मात्र सद्य:स्थितीत ६ अधिपरिचारिका कार्यरत आहेत. यापैकी २ अधिपरिचारिकांकडे मेट्रनचा प्रभार आहे. ४ अधिपरिचारिकांपैकी तिघांची इतरत्र बदली झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वायरल फि व्हरचा प्रकोप सुरू आहे. परिणामी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशास्थितीत कार्यरत असलेल्या मोजक्या अधिपरिचारिकांना २४ तास सेवा बजावावी लागते. अधिपरिचारिकांचे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावे, अशी मागणी अधिपरिचारिका पारधी यांनी आ. गजबे यांच्याकडे केली. सदर रिक्तपदे आरमोरी रुग्णालयात भरण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही आ. गजबे यांनी दिली.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक खिरसागर नाकाडे, भाजप तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, सुरेश मने, खरकाटे हजर होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Legislators know the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.