नारगुंडा येथे लर्निंग परवाना शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:26 IST2021-07-18T04:26:17+5:302021-07-18T04:26:17+5:30

कार्यक्रमाचे उद्घाटन सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक यादव यांच्या हस्ते करण्यात आले. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागांतील गरीब युवकांना ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी गडचिरोलीला ...

Learning License Camp at Nargunda | नारगुंडा येथे लर्निंग परवाना शिबिर

नारगुंडा येथे लर्निंग परवाना शिबिर

कार्यक्रमाचे उद्घाटन सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक यादव यांच्या हस्ते करण्यात आले. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागांतील गरीब युवकांना ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी गडचिरोलीला जाणे आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थितीत शक्य न झाल्याने बऱ्याच युवकांना ड्रायव्हिंग परवाना काढता आला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या बाबीची दखल घेऊन सूचना दिली. त्यानंतर शिबिर घेण्यात आले. उपस्थित नागरिकांना शासनाच्या कृषी व इतर विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दादालोरा खिडकीमार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. उपस्थित नागरिकांचे आधार कार्ड मोबाइलला लिंक नसल्यामुळे नारगुंडा येथे वायफायच्या नेटवर्कच्या भरवशावर फक्त १० नागरिकांचे लर्निंग लायसेन्स काढून देण्यात आले. उर्वरित युवकांना पुढील एक दिवस नारगुंडा पोमके हद्दीतील नागरिकांचे आधार अपडेट करून, आधार कार्डला मोबाइल लिंक करून, पुन्हा लर्निंग लायसेन्स कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

यशस्वितेसाठी प्रभारी अधिकारी पाेलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, कुणाल चव्हाण, क्षीरसागर, सानप व नारगुंडा पोलीस मदत केंद्रामधील अंमलदार यांंनी सहकार्य केले. पाेलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नारगुंडा हद्दीतील पोकुर, हलवेर, कोडपे, विसमुंडी, नैनवाडी, खंडी, कुचेर, मुत्तेमकुही व नारगुंडा गावचे १०० ते १५० नागरिक तसेच बहुतांश युवक कॅम्पकरिता हजर होते.

150721\11144029img-20210715-wa0041.jpg

लर्निंग लायसन काढताना

Web Title: Learning License Camp at Nargunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.