स्वच्छतेचे महत्त्व जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:37 IST2019-06-26T00:37:27+5:302019-06-26T00:37:58+5:30
सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिवनात स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

स्वच्छतेचे महत्त्व जाणून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिवनात स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी भवनाच्या सभागृहात सोमवारी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर कर्जत नगर परिषदचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, वेंगुर्ला नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी सोमनाथ शेट्टे, विभागीय तांत्रिक तज्ज्ञ पंकज कटारिया आदी उपस्थित होते.
आपला परिसर, घर कशाप्रकारे स्वच्छ ठेवता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक घरामध्ये डस्टबीन ठेवून कचºयाचे विलगीकरण करणे आवश्यक आहे, असे कोकरे यांनी सांगितले. ओला कचरा, सुका कचरा, इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात कचºयाचे विलगीकरण झाले पाहिजे.
प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर म्हणाले, कचºयाचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावयास हवे, हे सांगत नगर परिषद व नगर पंचायतींनी काय उपाययोजना कराव्या, यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. कचरा हा कुठेही जाळायचा नसून त्यामुळे वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी प्रतिबंध करण्याकरिता आपणच उपाय निश्चित करावे, असे सांगितले. यशवंत डांगे यांनी आपला गडचिरोली जिल्हा कसा स्वच्छ राहू शकतो, हे सांगत अभ्यास सहलीच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
सदर कार्यशाळेला उपविभागीय अधिकारी, नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, आरोग्य सभापती उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन व आभार सोमनाथ शेट्टे यांनी मानले.