सार्वजनिक ग्रंथालयाच्या अडीअडचणी पाेर्टलवर मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:51+5:302021-02-05T08:51:51+5:30

गडचिराेली : राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय गडचिराेली’ हा उपक्रम आयाेजित करण्यात आला आहे. ...

Lay the problem of public library on the portal | सार्वजनिक ग्रंथालयाच्या अडीअडचणी पाेर्टलवर मांडा

सार्वजनिक ग्रंथालयाच्या अडीअडचणी पाेर्टलवर मांडा

गडचिराेली : राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय गडचिराेली’ हा उपक्रम आयाेजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे विद्यार्थी, पालक, शिक्षक आदींच्या विविध अडचणी ऐकून त्या साेडविणार आहेत. या पाेर्टलवर शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अडीअडचणी संबंधितांनी मांडाव्यात, असे आवाहन नागपूर येथील सहायक ग्रंथालय संचालकांनी केले आहे.

गाेंडवाना विद्यापीठाने सर्वसंबंधित घटकांच्या साेयीसाठी विद्यापीठाच्या वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय गडचिराेली हे विशेष पाेर्टल निर्माण केले आहे. येथे नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकाेड मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहेत. निवेदनाची साॅफ्ट काॅपी जाेडण्याचीही व्यवस्था आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी आपली समस्या निवेदन स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना ऑनलाइन निवेदन सादर करणे शक्य हाेणार नाही, त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून सामंत यांच्याकडे निवेदन सादर करता येईल, असे कळविले आहे.

Web Title: Lay the problem of public library on the portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.