शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे कायदे कामगार विरोधी- चवळे

By admin | Updated: September 10, 2014 23:41 IST

केंद्र व राज्य सरकार कामगार विरोधी कायदे तयार करीत आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील कामगारांवर अन्याय होत आहे, अशी टिका आयटकचे पदाधिकारी देवराव चवळे यांनी केली.

देसाईगंज : केंद्र व राज्य सरकार कामगार विरोधी कायदे तयार करीत आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील कामगारांवर अन्याय होत आहे, अशी टिका आयटकचे पदाधिकारी देवराव चवळे यांनी केली.आयटक व सीटू संलग्नीत कामगार संघटनेच्यावतीने देसाईगंज येथे कामगार मेळावा रविवारी घेण्यात आला. या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. येथील गजानन महाराज सभागृहात आयोजित कामगार मेळाव्याचे उद्घाट अखिल भारतीय आदिवासी महासभेचे राज्याध्यक्ष हिरालाल येरमे यांच्या हस्ते झाले. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, जि. प. सदस्य अमोल मारकवार आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना देवराव चवळे म्हणाले, २१ व्या शतकात खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणामुळे कामगारांच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावेळी त्यांनी कामगाराच्या लढ्याचा इतिहासही सांगितला. डॉ. महेश कोपुलवार म्हणाले, कामगार कपात आणि पेंशन योजना, कंत्राटी पद्धती व सरकारी नोकर भरतीकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कामगारवर्गाने संघटीत राहून सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभारावा, असेही आवाहन डॉ. कोपुलवार यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि. प . सदस्य अमोल मारकवार, संचालन अ‍ॅड. जगदीश मेश्राम यांनी केले तर आभार कुसूम तितीरमारे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सुनिल पारधी, जलील खॉ पठाण, कांता फटिंग, कौशल्या गोंधोळे, शशीकला धात्रक, राधा ठाकरे, आशा चन्ने, मुक्ता लोणारकर, हरी नेवारे, सुखरू घरत, अमोल दामले, विलास तुपट, चंद्रभान मेश्राम, हरीपाल खोब्रागडे आदींनी सहकार्य केले. मेळाव्याला देसाईगंज तालुक्यातील कामगार महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)