१.९ कोटीच्या कामास शुभारंभ

By Admin | Updated: June 22, 2017 01:29 IST2017-06-22T01:29:45+5:302017-06-22T01:29:45+5:30

स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने जिल्हास्तरीय नगरोत्थान व रस्ता अनुदान योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या

Launching works of 1.9 crore | १.९ कोटीच्या कामास शुभारंभ

१.९ कोटीच्या कामास शुभारंभ

आमदारांची उपस्थिती : नगर पंचायततर्फे शहरात विविध कामे
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने जिल्हास्तरीय नगरोत्थान व रस्ता अनुदान योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आ. डॉ. देवराव होळी व नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांच्या हस्ते बुधवारी आष्टी-घोट टी-पार्इंटजवळ करण्यात आला. तब्बल एक कोटी ९ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
नगरोत्थान अनुदान योजनेतून ८९ लाख रूपये व रस्ता अनुदान योजनेतून २० लाखांची विकास कामे मंजूर करण्यात आली. शहरातील विविध वॉर्डात सिमेंट काँक्रिट रस्ता, नाली, स्लॅबडेन आदी कामे गतीने करण्यात येणार आहे. शहरातील विविध ३० ठिकाणी कामांची सुरुवात करण्यात आली आहे. सदर कामाच्या शुभारंभाप्रसंगी नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही, जि. प. सदस्य शिल्पा रॉय, सभापती विजय शातलवार, उपसभापती सुनीता धोडरे, नगरसेवक श्यामराव लटारे, वैभव भिवापुरे, प्रशांत येगलोपवार, विजय गेडाम, अविनाश चौधरी, कविता किरमे, मंजूषा रॉय, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, जयराम चलाख, साईनाथ बुरांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी चामोर्शी नगर पंचायतीचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

 

Web Title: Launching works of 1.9 crore