हनुमान मंदिराच्या सभागृहाचे लोकार्पण
By Admin | Updated: April 23, 2016 01:20 IST2016-04-23T01:20:23+5:302016-04-23T01:20:23+5:30
स्थानिक आष्टी-घोट टी-पार्इंट मार्गावरील हनुमान देवस्थान ट्रस्टतर्फे २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता...

हनुमान मंदिराच्या सभागृहाचे लोकार्पण
चामोर्शीत कार्यक्रम : आमदारांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार
चामोर्शी : स्थानिक आष्टी-घोट टी-पार्इंट मार्गावरील हनुमान देवस्थान ट्रस्टतर्फे २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता हनुमान जयंतीचे औचित्य साधून मुख्य सभागृहाच्या वरचे बांधकाम करण्यात येत असलेल्या खोलीचे उद्घाटन बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर सभागृहाच्या बाजुला नव्याने लोक वर्गणीतून बांधकाम करण्यात येत असलेल्या खोलीचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसीलदार यू. जी. वैद्य, वनपरिक्षेत्राधिकारी अभय ताल्हन, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, रवीशंकर बोमनवार, इलेश गांधी, सतीश पुट्टावार, डॉ. वासेकर, माणिकचंद कोहळे, आर. डी. राऊत, रत्नाकर बोमीडवार, लोमेश बुरांडे, हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काशिनाथ पिपरे, उपाध्यक्ष तपन कुंडू, सचिव देवाजी कुनघाडकर, मदन नैताम, शंकर खरवडे, श्रीकोंडावार, मदन चावरे, नरेश चिमुरकर, महेश अंबाडकर, वासेकर, हनुमान देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आ. डॉ. देवराव होळी यांचा हनुमान मंदिर देवस्थान समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
सभागृह बांधकामासाठी १० लाख रूपयांचा निधी देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या प्रबळ होण्यासाठी आध्यात्माचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन करीत हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्र. सो. गुंडावार, संचालन सुरेश कागदेलवार यांनी केले. हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात भजन, पूजन, गोपालकाला आयोजित करण्यात आला. डॉ. देवराव होळी व तहसीलदार वैद्य यांनी स्वत: प्रसादाचे वितरण केले. आष्टी-घोट टी-पार्इंट हनुमान देवस्थान ट्रस्टकडून वर्षभर पाणपोई, जनावरांसाठी पाण्याचा टाका असे लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. (शहर प्रतिनिधी)