३४ लाखांच्या कामांचा शुभारंभ
By Admin | Updated: July 4, 2015 02:33 IST2015-07-04T02:33:57+5:302015-07-04T02:33:57+5:30
स्थानिक कस्तुरबा वॉर्ड व हनुमान वॉर्डात प्रत्येकी एक समाजभवन

३४ लाखांच्या कामांचा शुभारंभ
दोन समाजभवन होणार : देसाईगंजात राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
देसाईगंज : स्थानिक कस्तुरबा वॉर्ड व हनुमान वॉर्डात प्रत्येकी एक समाजभवन अनुक्रमे १० लाख व २४ लाखांचा खर्च करून बांधले जाणार आहे. राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते गुरूवारी दोन्ही ठिकाणच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्ष श्याम उईके, मोतिलाल कुकरेजा, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, शालू दंडवते, आशा राऊत, प्रकाश गेडाम, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, मुरलीधर सुंदरकर, विलास साळवे उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासाकरिता विविध योजना राबवून विकसित जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान केले. (शहर प्रतिनिधी)