पोटेगावात खावटी अन्नधान्य वाटपाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:42 IST2021-08-12T04:42:15+5:302021-08-12T04:42:15+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य मालता मडावी होत्या. विशेष अतिथी म्हणून सरपंच अर्चना सुरपाम, मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर तर प्रमुख ...

पोटेगावात खावटी अन्नधान्य वाटपाचा शुभारंभ
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य मालता मडावी होत्या. विशेष अतिथी म्हणून सरपंच अर्चना सुरपाम, मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य ज्योती आलाम, तंटामुक्त समिती अध्यक्ष वामन कोडापे, पोलीस पाटील किशोर नरोटे, ग्रामसभा अध्यक्ष सुखदेव सुरपाम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शालिक पोटावी, कविता सुरपाम, अभिमन्यू सुरपाम, प्रकाश मडावी, माध्यमिक शिक्षक एस.आर. मंडलवार, व्ही.एस. कापसे उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वप्रथम क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले, तसेच सर्व क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी करून उपस्थितांचे आभारही मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पदवीधर प्राथमिक शिक्षिका बी. डी. वाळके, अधीक्षक एस.आर.जाधव, व्ही.एस. देसू, व्ही.एम.नैताम, व्ही.एस.कापसे, एन.पी.नेवारे, व्ही.के.नैताम, एन.ए. आलाम, हेमंत कन्नाके व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स :
१ हजार ४३ लाभार्थ्यांना मिळणार लाभ
खावटी योजनेंतर्गत आदिवासी विकास विभागाच्या वतीने पात्र आदिवासी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट २ हजार रुपये जमा करण्यात आले, तर २ हजार रुपयांचे अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप करण्यात येत आहेत. पोटेगाव आश्रम शाळेमार्फत पोटेगाव, देवापूर, जमगाव, मारदा, राजोली, सावेला, मारोडा आदी ग्रामपंचायतींतर्गत समाविष्ट गावातील १ हजार ४३ आदिवासी लाभार्थ्यांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येणार आहे.
090821\155909gad_2_09082021_30.jpg
खावटी अन्नधान्याचे वाटप करताना पं.स. सदस्य मालता मडावी व पदाधिकारी.