फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ

By Admin | Updated: April 2, 2016 01:50 IST2016-04-02T01:50:58+5:302016-04-02T01:50:58+5:30

न्याय आपल्या दारी या योजनेंतर्गत देसाईगंज दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या वतीने फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ

Launch of Court Mobile Vans | फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ

फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ

पैसा व वेळेची बचत : गावातच होणार न्यायनिवाडा
देसाईगंज : न्याय आपल्या दारी या योजनेंतर्गत देसाईगंज दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या वतीने फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ जिल्हा सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) टी. के. जगदाळे, फिरते अदालत न्यायाधीश आर. बी. म्हशाखेत्री, देसाईगंजचे दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघेल, अ‍ॅड. अविनाश नाकाडे, अ‍ॅड. अतुल उईके, अ‍ॅड. दत्तू पिल्लारे, अ‍ॅड. खोब्रागडे आदी उपस्थित होते.
सदर मोबाईल व्हॅनद्वारे संपूर्ण जिल्ह्यात महिनाभर गावातच तंट्यांचा व प्रकरणाचा न्याय निवाडा करण्यात येणार आहे. यामुळे पैसा व वेळेची बचत होईल. मागील चार वर्षांपासून सदर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देसाईगंज सेवा प्राधिकरणाचे सदस्य तथा न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Launch of Court Mobile Vans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.