सीएम चषक स्पर्धेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:37 IST2018-11-03T23:36:14+5:302018-11-03T23:37:27+5:30
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सीएम चषक स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनीत खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला.

सीएम चषक स्पर्धेचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सीएम चषक स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनीत खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. सीएम चषक स्पर्धा ही भारतातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून, विधानसभा क्षेत्रातून विजयी संघ व खेळाडूंना जिल्हा व त्यानंतर राज्य स्तरावर खेळण्याची संधी मिळणार असल्याने गडचिरोली जिल्ह्याचे नाव लौकिक करता येणार आहे. या संधीचे सोने करीत आपण राज्यस्तरीय स्पर्धा जिंकण्यासाठी खेळावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी केले. सर्वप्रथम गडचिरोली शहरातून रॅली काढण्यात आली. भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, डॉ. भारत खटी, भाजप शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, पं.स. उपसभापती विलास दशमुखे, चामोर्शी नगर पंचायतीच्या अध्यक्ष प्रज्ञा उराडे, धानोरा नगर पंचायत अध्यक्ष लीना साळवे, गडचिरोली नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, महामंत्री चेतन गोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, गडचिरोली भाजपा तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, धानोरा भाजपा तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, चामोर्शी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, सीएम चषक जिल्हा संयोजक अनिल तिडके, विधानसभा संयोजक गणेश नेते, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष डी. के. मेश्राम, महामंत्री जनार्धन साखरे, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, दत्तू माकोडे, सीएम वॉर रूमचे निकेश कुकडे, आयोजन समितीचे संयोजक अविनाश महाजन, प्रशांत येगोलपवार, निखिल चरडे, नरेश अलसावार, सारंग साळवे, जिल्हा परिषदेचे सदस्य, गडचिरोली चामोर्शी व धानोराचे न. पं. सभापती, नगरसेवक पं. स. सदस्य, नगर सेवक, भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.