दोन दिवसांपासून आलापल्ली ग्राम पंचायत कुलूपबंद

By Admin | Updated: October 16, 2015 01:54 IST2015-10-16T01:54:07+5:302015-10-16T01:54:07+5:30

स्थानिक ग्राम पंचायतीचा कार्यभार ग्रामसेवक व्ही. टी. वेलादी यांच्याकडे ९ आॅक्टोबर रोजी सोपविण्यात आला आहे.

From last two days the elpalli gram panchayat lockupand | दोन दिवसांपासून आलापल्ली ग्राम पंचायत कुलूपबंद

दोन दिवसांपासून आलापल्ली ग्राम पंचायत कुलूपबंद

आलापल्ली : स्थानिक ग्राम पंचायतीचा कार्यभार ग्रामसेवक व्ही. टी. वेलादी यांच्याकडे ९ आॅक्टोबर रोजी सोपविण्यात आला आहे. मात्र यापूर्वीचे ग्रामसेवक दासरवार हे ग्राम पंचायतीच्या कार्यालयाची चावी घेऊन पसार झाले असल्याने मागील दोन दिवसांपासून ग्राम पंचायत कार्यालय कुलूपबंद असून कार्यालयीन कामे ठप्प पडली आहेत.
दासरवार व ग्राम पंचायतीचे पदाधिकारी यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत असल्याने दासरवार यांची बदली करावी, अशी मागणी ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी व संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली होती. दासरवार हे नेहमी गैरहजर राहत असल्याने ग्रा. पं. सदस्य संतप्त होते. ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार वेलादी यांच्याकडे प्रभार सोपविला. मात्र दासरवार यांनी वेलादी यांच्याकडे प्रभार न सोपविताच ग्रामसेवक कक्षाला कुलूप ठोकून निघून गेले. त्यामुळे कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प पडला आहे. दासरवार यांच्याकडून चावी मागून कार्यालयीन कामकाज सुरळीत करावा, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य व नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: From last two days the elpalli gram panchayat lockupand