लोकनेत्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

By Admin | Updated: November 16, 2015 00:32 IST2015-11-16T00:32:35+5:302015-11-16T00:32:35+5:30

प्रमोद शेंडे यांच्या रूपाने वर्धा जिल्ह्याने एक लोकनेता हरवला. त्यांच्या निधनाने वर्धा जिल्ह्यावर शोककळा पसरली होती.

Last reply to Shree Nayanas by Shantu Nayana | लोकनेत्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

लोकनेत्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

जनसागर लोटला : इंदिरा सूत गिरणीच्या आवारात चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
वर्धा : प्रमोद शेंडे यांच्या रूपाने वर्धा जिल्ह्याने एक लोकनेता हरवला. त्यांच्या निधनाने वर्धा जिल्ह्यावर शोककळा पसरली होती. नेहमी गजबजलेले वर्धा शहर आज शांत होते. प्रत्येकांच्या तोंडी प्रमोद शेंडे यांच्या निधनाची चर्चा होती नव्हे, तर त्यांनी आपल्या राजकीय कारर्दीतील गाजविलेल्या प्रत्येक गोष्टीचीच चर्चा होती. एकूण शहरातील नागरिक त्यांच्या निधनाने शोकमग्न झाले होती.
या लोकनेत्याला त्यांचे चिरंजीव रवी शेंडे, माजी नगराध्यक्ष शेखर व आकाश शेंडे यांनी मुखाग्नी देताच ते अनंतात विलीन झाले. काहींनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. स्नेहनगरातील निवासस्थानावरुन त्यांची अंत्ययात्रा निघाली. तेव्हा ‘प्रमोदबाबू अमर रहे’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. इंदिरा सूतगिरणीच्या आवारात अंत्ययात्रा पोहोचल्यानंतर तिरंग्यात गुंडाळून असलेले प्रमोद शेंडे यांच्या पार्थिवाला जिल्हा पोलिसांद्वारे सलामी देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. यानंतर भडाग्नी देताच हवेत तीन फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली. झालेल्या शोकसभेत अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार अमर काळे, माजी खासदार दत्ता मेघे, नागपूर येथील एनआयटीचे आयुक्त श्याम वरधने, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर, शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
नागपूर येथील वोक्हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील काँग्रेसचा एक निष्ठावान नेता हरविल्याच्या प्रतिक्रीया राजकीय क्षेत्रातून येवू लागल्या. तर अनेकांचा दादा (अनेकजण त्यांना आदराने दादा म्हणत) आपल्यात नाही यावर विश्वास बसत नसल्याचे दिसून आले. त्यांच्या निधनाची वार्ता पाहता पाहता जिल्ह्यात पसरली. जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली. लाडक्या नेत्याच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांसह कार्येकर्ते हिरमुसले. रात्रीपासूनच त्यांच्या अंत्यदर्शनाकरिता त्यांची पावले शेंडे यांच्या स्रेहल नगर येथील घराकडे वळली. त्यांचे पार्थिव नागपूर येथून रात्रीच्या सुमारास स्रेहलनगर येथील यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. सकाळपासूनच त्यांच्या चाहत्यांनी अंत्यदर्शनाकरिता रीघ लावली होती. निवासस्थानी शीतपेटीत ठेवलेल्या प्रमोद शेंडे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन अनेकांनी घेतले. यावेळी राजकीय नेत्यांची गर्दी झाली होती. तर अनेकांनी त्यांच्या मुलांशी संपर्क साधत शोकसंवेदना व्यक्त केल्या.
दुपारी ३ वाजताच्या सुमारास फुलांनी सजविलेल्या एका ट्रकमधून शासकीय इतमामात त्यांची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत शहरातील नागरिकांसह त्यांनी केलेल्या विकास कामाची पावती म्हणून सेलू भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘प्रमोदबाबू अमर रहे’ अशा घोषणा देत त्यांची अंत्ययात्रा त्याच्याच मालकीच्या इंदिरा सूतगिरणीत तयार करण्यात आलेल्या व फुलांनी सजविलेल्या ओट्यावर रचलेल्या चितेत ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या चाहत्यांची गर्दी केली होती.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रवीण हिवरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष सुनील कोल्हे, जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जि.प. सदस्य राणा रणनवरे, सुनीता ढवळे, पं.स. सदस्य डॉ. बाळा माऊस्कर, अर्चना वानखेडे, न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकांत बालपांडे, वर्धा बाजार समितीचे सभापती शरद देशमुख, माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाने, जांबुवंतराव धोटे, गजानन कोटेवार, देवा निखाडे, प्रदीप ठाकूर, विजय जावंधीया, शालीग्राम टिबडीवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रमोद शेंडे यांच्या पार्थवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर प्रशासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून हवेत तीन तीन फैरी झाडत त्यांना मानवंदना देण्यात आली. सत्तेत नसतानाही जिल्ह्यात विकास कामे खेचून आणणाऱ्या या लोकनेत्याला मिळालेल्या अखेरच्या सन्मानाने वातावरण भारावले होते.
फुलांनी सजविलेल्या ट्रकवरून निघाली अंत्ययात्रा
फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून प्रमोद शेंडे यांची अंत्ययात्रा शासकीय इतमामात काढण्यात आली. त्यांना मानवंदना देण्याकरिता सशस्त्र पोलिसांचा ताफा अंत्ययात्रेसमोर चालत होता. त्या पाठोपाठ असंख्य मान्यव व त्यांच्या चाहत्यांचा ताफा इंदिरा सूत गिरणीपर्यंत चालत गेला. त्यांची अखेरच्या प्रवासाचे दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी केली होती.
पार्थिवा सभोवताल स्नूषा व नातवंड
प्रमोद शेंडे यांचे पार्थिव घरी आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू आवरता आले नाही. हा प्रसंग बघून अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
जुन्या आठवणींना उजाळा
शेंडे यांच्या निवास्थानी आलेल्या प्रत्येकाकडून दादांच्या कामाची चर्चा होत होती. प्रत्येकाच्या तोंडून जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.

Web Title: Last reply to Shree Nayanas by Shantu Nayana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.