हेमाडपंथी मंदिरे मोजताहेत शेवटच्या घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 16:11 IST2017-05-26T16:11:50+5:302017-05-26T16:11:50+5:30
विदर्भाची काशी म्हणून परिचित असलेल्या मार्कंडा, चप्राडा, अरततोडी, आरमोरी किंवा वैरागड येतील अनेक हेमाडपंथी मंदिरे शेवटच्या घटका मोजत असून पुरातत्त्व विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

हेमाडपंथी मंदिरे मोजताहेत शेवटच्या घटका
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली- विदर्भाची काशी म्हणून परिचित असलेल्या मार्कंडा, चप्राडा, अरततोडी, आरमोरी किंवा वैरागड येतील अनेक हेमाडपंथी मंदिरे शेवटच्या घटका मोजत असून पुरातत्त्व विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
आरमोरी तालुक्यापासून १५ कि.मी. अंतरावर असलेले वैरागड हे गाव ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती मातेची मूर्ती असा वारसा आजवर जपत आले आहे. या भागात हेमाडपंथी मंदिरांचा ठेवा अनेक ठिकाणी आहे. पण स्थानिक प्रसासन किंवा धार्मिक संस्था वा पुरातत्त्व विभाग यापैकी कुणीही त्याच्या देखभालीकरिता पुढे आलेले नाही. देखभालीविना हे मंदिर जागोजागी खचले असून अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचेही काम बाकी आहे. लाखमोलाच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन केले जावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.