शेवटचा माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:44 PM2019-08-16T23:44:15+5:302019-08-16T23:45:14+5:30

विकासाचा केंद्रबिंदू हा शेवटचा माणूस, अर्थात आपला ‘आम आदमी’ आहे. लोककल्याणाच्या विविध योजनांमधून विकासाची गंगा अशाच पध्दतीने पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले.

The last one is the focus of development | शेवटचा माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू

शेवटचा माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू

Next
ठळक मुद्देआदिवासी विकासमंत्र्यांची ग्वाही : लोककल्याणाच्या योजनांमधून विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी कटीबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विकासाचा केंद्रबिंदू हा शेवटचा माणूस, अर्थात आपला ‘आम आदमी’ आहे. लोककल्याणाच्या विविध योजनांमधून विकासाची गंगा अशाच पध्दतीने पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले. स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण व सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
गुरूवारी डॉ.उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विविध विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळयाला खासदार अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांच्यासह इतर पदाधिकारी, अधिकारी, नागरीक उपस्थित होते.
यावेळी डॉ.उईके यांनी गडचिरोली जिल्हयातील विविध विकास कामांची माहिती त्यांनी जनतेसमोर ठेवली. जिल्हयातील ३५,३३१ शेतकºयांना १०० कोटी १९ लक्ष रूपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. शेतीविषयक उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर्ज स्वरूपात २० हजार ५९ शेतकºयांना ८४ कोटी २८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. शबरी घरकुल योजनेतून २०१५-१६ पासून आजपर्यंत ९४८ घरकुलांचा लाभ देण्यात आला. आदिम जमाती घरकुल योजनेतून ३०० घरकुलांचा लाभ देण्यात आला. आता आदिम जमाती घरकुल योजनेचा लक्ष्यांक ५०० करण्यात आला आहे. १९९२ साली सुकथनकर समितीने राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकासाकरीता ९ टक्के निधीची तरतूद द्यावी अशी शिफारस केली. २०१४ ला मुख्यमंत्र्यांंच्या नेतृत्वात ९ टक्के निधी आदिवासी विकासाकरीता देण्यास सुरूवात झाली. पेसाअंतर्गत येणाºया ग्रामपंचायतींना ५ टक्के निधी देण्यात येत आहे आणि हा भारतातील पहिला निर्णय ठरला आहे. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. संचालन क्र ीडा अधिकारी मदन टापरे यांनी तर आभार उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी मानले.

सत्कारास पात्र ठरलेले अधिकारी-कर्मचारी
ध्वजारोहण कार्यक्र मानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाºयांचा आदिवासी विकासमंत्र्यांनी गौरव केला. यावेळी बहुतांश सत्कारार्थी आपापल्या भागातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने मंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारू शकले नाही.

संत गाडगेबाबा अभियानासाठी धानोरा तालुक्यातील जांभळीचे रत्नमाला बावणे (सरपंच) व किशोर कुलसंगे (सचिव) यांना प्रथम, कुरखेडा तालुक्यातील अरततोंडीचे प्रियंका हलामी (सरपंच) व महेंद्र देशमुख (सचिव) यांना द्वितीय तर आरमोरी तालुक्यातील मानापूरचे धनीराम कुमरे (सरपंच) व वैशाली ढोरे (सचिव) यांना तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

सत्कारास पात्र ठरलेल्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल एटापल्लीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, गट्टाचे आरएफओ एम.एम.पाटील, सिरोंचाचे सहायक वनसंरक्षक एम.एम.गाजलवार यांचा समावेश होता.

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हेडरीचे एसडीपीओ शशिकांत भोसले, सी-६० पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक नेताजी वडगर, गट्टाचे उपनिरीक्षक संदीप बोरकर, अहेरीचे उपनिरीक्षक सचिन जनक यांचा समावेश होता.

मतदान केंद्राध्यक्ष, अधिकाºयांमध्ये शैलेंद्र अंबादे, स्वप्नील पाझारे, गणू गोरे, रुपेश नागदेवते, वामन पोरेटी, राहुल अंधार, पी.ए.गेडाम, अश्विन सोनुले, कपिलकुमार शर्मा, किशोर गोटा, एन.जे.पेंदोर, अलताब शेख, गिरीष तुलावी आदींचा समावेश होता. आदर्श तलाठी म्हणून आरमोरी तालुक्यातील देलोडाचे तलाठी पी.एम.धात्रक यांना सन्मानित करण्यात आले.

आरोग्य विभागातील चांगल्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी आदींसह वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत असलेले डॉ.मिलिंद मेश्राम, डॉ.प्रमोद उंदीरवाडे, बेबी वड्डे, डॉ.अभिजित गादेवार, डॉ.भूषण लायवर, डॉ.भुवन मेश्राम, डॉ.राम लडके, डॉ.वागराज धुर्वे, आनंद मोडक यांचा सत्कार करण्यात आला.

गोवर रूबेला लसीकरणासाठी लॉयन्स क्लबच्या अध्यक्ष संध्या लडके, अ‍ॅम्बेसेडर, एंजल देवकुले, तसेच सामाजिक वनीकरणातील कामगिरीसाठी जि.प.प्राथमिक शाळा ठाकरी, ता.चामोर्शी यांना शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने (५० हजार रुपये) सन्मानित करण्यात आले.

Web Title: The last one is the focus of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.