शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

...अन् त्या शेतकऱ्यांचा १० मिनिटे बिबट्याशी समोरासमोर झाला सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 05:00 IST

इल्लूर येथील शेतकरी विश्वनाथ घुसाजी बामनकर हे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शेतात बैल चारायला घेऊन जात होते. दरम्यान, बैल थांबले. त्यांना पुढे हाकल्यानंतरही ते पुढे जात नव्हते. बैल का पुढे जात नाहीत, हे पाहण्यासाठी बामनकर पुढे येताच रस्त्यालगतच्या झुडूपातून बिबट्याने रस्त्यावर उडी मारली आणि तो बामनकर यांच्यापुढे उभा राहिला. बिबट्याला पाहताच समोर असलेला एक बैल पळून गेला.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून दोघांना ठार केल्यानंतर एका बिबट्याला वन विभागाने पिंजऱ्यात जेरबंद केल्याचा दावा केला आहे. अजूनही या परिसरात इतर बिबट्यांचा वावर कायम आहे. बुधवारी शेतात बैल घेऊन जाताना एका शेतकऱ्याचा बिबट्याशी समोरासमोर तब्बल १० मिनिटे सामना झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्या शेतकऱ्याचे प्राण वाचले. या प्रसंगाने त्या शेतकऱ्याला चांगलेच हादरवून सोडले आहे.इल्लूर येथील शेतकरी विश्वनाथ घुसाजी बामनकर हे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शेतात बैल चारायला घेऊन जात होते. दरम्यान, बैल थांबले. त्यांना पुढे हाकल्यानंतरही ते पुढे जात नव्हते. बैल का पुढे जात नाहीत, हे पाहण्यासाठी बामनकर पुढे येताच रस्त्यालगतच्या झुडूपातून बिबट्याने रस्त्यावर उडी मारली आणि तो बामनकर यांच्यापुढे उभा राहिला. बिबट्याला पाहताच समोर असलेला एक बैल पळून गेला. मात्र, एका बैलाचा कासरा विश्वनाथ बामनकर यांनी उजव्या हातात घट्ट पकडून ठेवला होता. समोर पाच ते सात फुटावर  बिबट उभा आणि त्याला पाहात शेतकरी आणि त्यांचा एक बैलही तिथेच उभा होता. हा थरार जवळपास १० मिनिटे चालला. हातात काठी आणि सोबत बैल असल्याने ते हिंमत ठेवून तिथेच उभे होते.बैल असल्यामुळे बिबट्याने हल्ला करण्याची हिंमत केली नाही. त्यानंतर  बिबट्याने माघार घेऊन तेथून काढता पाय घेतला. 

शेतकरी म्हणतात, तुम्हीच उपाय सांगाया प्रसंगाने बामनकर यांना चांगलाच थरकाप सुटला होता. त्याच ठिकाणी इल्लूर येथील एका इसमाला बिबट्याने ठार केले होते. त्या झुडुपात बिबट्याने बस्तान मांडलेले असताना वन विभागाने तेथे लावलेले पिंजरे दुसऱ्याच दिवशी का काढले? असा प्रश्न गावकरी करीत आहेत. नशीब बलवत्तर म्हणून प्राण वाचले, असे उद्गार विश्वनाथ बामनकर यांनी काढले. बिबट्याच्या भीतीने जंगलालगतच्या शेतात कसे जायचे? हा प्रश्न  शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तिकडे जंगली डुकरे शेतातील पिकांचे नुकसान करीत आहेत.

 

टॅग्स :leopardबिबट्या