शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अनेक तलाव मोजताहेत शेवटची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 22:31 IST

मृग नक्षत्र उत्तरार्धाकडे वळला असून वरूण राजाच्या आगमनाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा चांगल्या प्रकारची जल क्षमता असलेले अनेक तलाव देखील आता शेवटच्या घटका मोजत असल्याने अनेक गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजलक्षमता घटली : पाऊस बरसत नसल्याने शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : मृग नक्षत्र उत्तरार्धाकडे वळला असून वरूण राजाच्या आगमनाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा चांगल्या प्रकारची जल क्षमता असलेले अनेक तलाव देखील आता शेवटच्या घटका मोजत असल्याने अनेक गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.आरमोरी-वैरागड मार्गावरील वैरागडपासून चार किमी अंतरावर पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणाºया तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होता. दरवर्षीच्या उन्हाळ्यात या तलावात पाच फुटापेक्षा कमी जलसाठा कधीही राहत नव्हता, असा अनुभव अनेकजण सांगतात. मात्र या वर्षात सदर तलावाने तळ गाठला आहे. या तलावाच्या परिसरात राहणारे वन्यजीव आपली तृष्णा तलावाच्या पाण्यावर भागवित होते. मात्र आता वन्यजीवांची भटकंती वाढली आहे. काही दिवसानंतर वन्यजीवांना पाणी मिळणे कठीण होणार आहे. जंगलातील लहान, मोठे सर्व जलसाठे कोरडे पडले असून वन्यजीवांची तहाण भागविण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याअभावी अनेक वन्यजीव तडफडून प्राण सोडत आहेत. ज्या ठिकाणी अल्प जलसाठा आहे, त्या ठिकाणी शिकार करणारे लोक सापळे रचून प्राणी व पक्षांची शिकार करीत असल्याचे दिसून येत आहे. वैरागड परिक्षेत्रातील चूनबोडी, महादेव तलाव, गोरजाई डोहाने यावर्षी तळ गाठला आहे.जलसाठे कोरडे पडल्याने जनावरांना तहाण भागविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतिक्षा असून ज्या शेतकºयांकडे सिंचन सुविधा आहे, असे शेतकरी धान लागवडीसाठी पºहे टाकत आहेत. पावसाने लवकर हजेरी लावल्यास खरीप हंगामाला वेग येणार आहे. शेतकरी वर्ग वरूण राजाची चातक पक्ष्याप्रमाणे प्रतिक्षा करीत आहे.

टॅग्स :Waterपाणी