लखमापूर बोरीत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले
By Admin | Updated: June 29, 2015 02:04 IST2015-06-29T02:04:52+5:302015-06-29T02:04:52+5:30
चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील जुन्या बसस्थानकापासून नवीन बसस्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करून ...

लखमापूर बोरीत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील जुन्या बसस्थानकापासून नवीन बसस्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करून २० फूट जागा गिळंकृत केली आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
सदर मार्गावरून गोंडपिपरी, आष्टी व चपराळाकडे जाणाऱ्या बसफेऱ्या आहेत. शिवाय लखमापूर बोरी येथूनही भेंडाळा, हरणघाटकडे अनेक नागरिक जातात. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. या मार्गावरील लखमापूर बोरीजवळच्या बसस्थानक परिसरात अतिक्रमण करून जागा काही नागरिकांनी हस्तगत केल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा शेणखाताचे ढिग असल्याने रस्त्याची रूंदी कमी होत चालली आहे. ग्रामपंचायतीच्या मार्फतीने शेणखत खड्ड्याच्या मालकांना नोटीस पाठवण्यिात आली होती. मात्र अजूनपर्यंत त्यांच्यावर ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही. भविष्यात या ठिकाणी होणारा धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चालल्याने तीव्र समस्या निर्माण झाली आहे. (वार्ताहर)