शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड तालुक्यातील तलाव कोरडेच

By admin | Updated: July 29, 2014 23:48 IST

येथील दीडशे ते दोनशे एकर जमीन सिंचनाखाली आणणारा भामरागडचा तलाव जून, जुलै महिना लोटूनही अद्याप कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

भामरागड : येथील दीडशे ते दोनशे एकर जमीन सिंचनाखाली आणणारा भामरागडचा तलाव जून, जुलै महिना लोटूनही अद्याप कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. गतवर्षी भामरागडचा हा तलाव या कालावधीत १०० टक्के पूर्ण भरला होता. यावर्षी शेतीच्या कामाला सुरूवात होऊन दोन महिने लोटेले. परंतु तलाव भरलेला नाही. तलाव भरलेला नसल्याने गावातील पाण्याची पातळीही खालावलेलीच आहे. या तलावाच्या भरवशावर २०० एकर शेतीचे सिंचन होते. मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तलावाच्या पाण्याची फारशी गरज भासली नव्हती. शेतीचे काम संपल्यानंतर तलाव तुडूंबच भरून होता. या भागात पुन्हा पीक घेतली जात नाही. जिंजगाव, मन्नेराजाराम, मलमपोडूर, येचली, कियर या गावात तलावामध्ये मोठा जलसाठा शिल्लक असल्याने गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली होती. इतर भागाप्रमाणे या तालुक्यात कमी पाऊस झालेला आहे. यंदा तालुक्याची वाटचाल कोरड्या दुष्काळ्याच्या दिशेने सुरू झाली आहे. मागील आठवड्यातील चार-पाच दिवस वगळता पाऊस न झाल्याने शेतकरीही चिंताग्रस्त आहे. यंदा शेतकऱ्यांसमोरही कमी पावसामुळे बिकट परिस्थिती आहे.भामरागड तालुक्यात एकही सिंचन योजना नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी पावसाच्या भरवशावर शेती करतात. अलीकडे धानाच्या व्यतिरिक्तही दुसरे पीक शेतकरी घेत आहेत. गावातील तलाव हे शेतीच्या सिंचनासाठीचे मोठे स्त्रोत आहे. मात्र यंदा तलाव पावसाअभावी रिकामे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालांतराने भामरागडला पाणी टंचाईची समस्याही जाणविण्याची शक्यता आहे. या तालुक्यातील मोठ्या नद्यांवर सिंचन योजना कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)