लहुजी मडावी अनंतात विलीन

By Admin | Updated: August 17, 2016 01:42 IST2016-08-17T01:42:34+5:302016-08-17T01:42:34+5:30

येथील ज्येष्ठ सर्वोदयी नेते, दलित मित्र लहुजी मंगुजी मडावी यांचे १५ आॅगस्ट रोजी दुपारी ३.१० वाजता वृद्धापकाळाने

Lahuji mudavi intestine merged | लहुजी मडावी अनंतात विलीन

लहुजी मडावी अनंतात विलीन

१५ आॅगस्ट रोजी निधन : सर्वोदयी चळवळीचा आधारस्तंभ हरपला
गडचिरोली : येथील ज्येष्ठ सर्वोदयी नेते, दलित मित्र लहुजी मंगुजी मडावी यांचे १५ आॅगस्ट रोजी दुपारी ३.१० वाजता वृद्धापकाळाने जिल्हा सामान्य रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते १०० वर्षांचे होते. १६ आॅगस्ट रोजी कठाणी नदीघाटावर त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे सर्वोदयी चळवळीचा आधारस्तंभ हरपला आहे. त्यांच्या पश्चात आदिवासी सेवक घनश्याम मडावी हे सुपुत्र आहेत. त्याचबरोबर दोन मुली, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.
लहुजी मडावी यांचा जन्म गडचिरोली येथे १ एप्रिल १९१७ रोजी झाला. त्यांनी सातव्या वर्गापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जून १९३८ पासून प्राथमिक शाळेत शिक्षकाच्या नोकरीवर ते रूजू झाले. मात्र काही वर्षानंतर नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक चळवळीत स्वत:ला वाहून घेतले. १९८२-८३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने दलित मित्र या पुरस्काराने सन्मानित केले. २००१ मध्ये महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर यांचेकडून स्मृतीचिन्ह, २००१ मध्ये त्रिदर्शक स्मृती प्रमाणपत्र, २००३ मध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेअंतर्गत वीर बिरसामुंडा राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले. ते गडचिरोली जंगल कामगार सहकारी संस्थेचे १० वर्ष अध्यक्ष होते. ठाकूरदास बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात सर्वोदय चळवळीचा प्रचार करण्याची जबाबदारी लहुजी मडावी यांच्यावर सोपविली होती. मडावी यांनी सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश यांच्या विचारांचा प्रचार केला. गडचिरोली जिल्हा निर्मिती व जिल्ह्यात दारूबंदी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते डीसीसी बँकेचे संचालकही होते. १९८२ मध्ये त्यांनी गडचिरोली येथे राणी दुर्गावती कन्या विद्यालय सुरू केले. अंत्यसंस्काराच्या वेळी गुरूदेव सेवा मंडळाचे सेवा अधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे, माजी खा. मारोतराव कोवासे, अ‍ॅड. मनिराम मडावी, आर. यू. केराम, कृष्णराव परतेकी, प्रभू राजगडकर, कुसूम आलाम, डॉ. शिवनाथ कुंभारे, रोहिदास राऊत उपस्थित होते.

Web Title: Lahuji mudavi intestine merged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.