काैसर खान ।लाेकमत न्यूज नेटवर्कसिराेंचा : पदव्यूत्तर शिक्षण घेतलेली व डाेंगराळ भागावर असलेल्या रेगुंठा येथील २३ वर्षीय युवती किरण रमेश कुर्मा हिने स्वत: टॅक्सी ड्रायव्हर बनून बेराेजगारीवर मात केली. याबाबत लाेकमतने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करून किरणचे मनाेबल उंचावले हाेते. तिच्या या सेवेची व कामाची दखल घेऊन फाॅरेवर स्टार इंडिया अवाॅर्ड जयपूर राजस्थान संस्थेने किरणला पुरस्कार देऊन सन्मानित केले.गडचिराेली जिल्ह्यात रेगुंठासारख्या अतिसंवेदनशील व दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल किरणला गाेल्ड बुक ऑफ स्टार रेकार्ड २०२०, राष्ट्रप्रेरणा अवाॅर्ड आत्मनिर्भर भारत २०२०, स्टार बुक ऑफ इंटरनॅशनल २०२० तसेच फाॅरेवर स्ट्रार इंडिया अवाॅर्डने सन्मानित करण्यात आले आहे. अनेक अवाॅर्ड प्राप्त करणाऱ्या किरणने देशात सिराेंचा तालुक्याचा नावलाैकीक केला आहे. काेराेना याेद्ध्याचा आदर करण्यासाठी एफएसआयए-फाॅरेेर स्टार इंडिया अवाॅर्डद्वारे सुपर हिराे पुरस्कार २०२० आयाेजित करण्यात आला. एफएसआयए पुरस्कार हा भारताचा पहिला आणि सर्वात माेठा प्लॅटफार्म आहे. काेराेना लाॅकडाऊनच्या कठीण दिवसात ज्यांनी ज्यांनी प्रशासनीय काम केले त्यांच्या संघर्ष व कठाेर परिश्रमणासाठी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. अशा या मानाच्या पुरस्काराने ट्रॅक्सी ड्रायव्हर किरणला सन्मानित करण्यात आले. हलाखीच्या परिस्थितीचा सामना करीत किरण हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेत हाेती. मात्र नाेकरीसाठी संघर्ष करणे शक्य हाेणार नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर तीने वडीलाला टॅक्सीच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. गेल्या पाच वर्षांपासून किरण उत्तमरित्या टॅक्सी चालवित आहे. या व्यवसायात परिश्रम घेऊन आजच्या घडीस किरण तीन टॅक्सीची मालक आहे. खासगी प्रवाशी वाहन चालविणारी किरण ही गडचिराेली जिल्ह्यातील पहिली महिला चालक आहे.
लाेकमतने गावपातळीवरील माझे कार्य लाेकांपुढे आणून महाराष्ट्रासह देशात मला नावलाैकीक मिळविण्यासाठी सहकार्य केले आहे. लाेकमत वृत्तपत्राचे मी आभार मानते. शासनाने मला सेवा करण्याची संधी दिली तर मी उत्तम कार्य करील.- किरण कुर्मा, रेगुंठा (सिराेंचा)