सिराेंचा काेविड केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST2021-04-28T05:00:00+5:302021-04-28T05:00:37+5:30

सिराेंचा हा जिल्ह्याच्या शेवटच्या टाेकावर असलेला तालुका आहे. अहेरीपासून सिराेंचा १०० किमी अंतरावर, तर जिल्हास्थळापासून २०० किमी अंतरावर आहे. अहेरीपर्यंत रस्ता अतिशय खराब आहे. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णाला अहेरी किंवा गडचिराेली येथे भरती करण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने ताे दम ताेडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जाच्या सुविधा सिराेंचा येथे असणे आवश्यक हाेते.

Lack of staff at Siraen's Cavid Care Center | सिराेंचा काेविड केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव

सिराेंचा काेविड केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव

ठळक मुद्दे९५ रुग्ण घेत आहेत उपचार, १२४ बेडची सुविधा

लाेकमत न्यूज नेटवर्क
सिराेंचा : रामंजापूर मार्गावर असलेल्या माॅडेल हायस्कूलमध्ये काेराेना रुग्णांसाठी केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी १२४ बेड आहेत. सध्या ९५ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, रुग्णांच्या तुलनेत आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने काेराेना रुग्णांची हेळसांड हाेत असल्याचे दिसून येत आहे.
सिराेंचा हा जिल्ह्याच्या शेवटच्या टाेकावर असलेला तालुका आहे. अहेरीपासून सिराेंचा १०० किमी अंतरावर, तर जिल्हास्थळापासून २०० किमी अंतरावर आहे. अहेरीपर्यंत रस्ता अतिशय खराब आहे. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णाला अहेरी किंवा गडचिराेली येथे भरती करण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने ताे दम ताेडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जाच्या सुविधा सिराेंचा येथे असणे आवश्यक हाेते. मात्र या ठिकाणी केवळ काेअर केअर सेंटर सुरू करण्यात आले. बेडची क्षमता अधिक असली तरी गंभीर स्थितीतील रुग्णावर उपचार हाेत नाही. तालुक्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रांमधील काही कर्मचाऱ्यांना काेविड केअर सेंटरमध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढली
असतानाही कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना वेळेवर उपचार मिळण्यास अडचण हाेत आहे. या ठिकाणी १०० बेडचे रुग्णालय निर्माण करावे. रुग्णालयासाठी आवश्यक कर्मचारीवर्ग व यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हाेत आहे. जिल्हा प्रशासनाने आढावा घेण्याची गरज आहे.

सिराेंचाच्या रुग्णांचा भार तेलंगणा राज्यावर
सिराेंचापासून जिल्हास्थळ २०० किमी अंतरावर आहे. रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णाला गडचिराेली येथे भरती करणे कठीण हाेते. त्यामुळे सिराेंचा तालुक्यातील गंभीर रुग्ण तेलंगणा राज्यातील सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये दाखल हाेतात. महाराष्ट्राचे रहिवासी असूनही आराेग्य सेवेबाबत तेलंगणाच्या आराेग्य सेवेवर अवलंबून राहावे लागते, ही शाेकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया सिराेंचा तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Lack of staff at Siraen's Cavid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.