लगाम येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:24+5:30
बाह्य रुग्ण विभागात दर महिन्याला जवळपास १७०० ते २००० रुग्णांची तपासणी केली जाते. एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांची तपासणी करणे, भरती असलेल्या रुग्णांकडे लक्ष ठेवणे तसेच रुग्णालयाचा दैनंदिन प्रशासकीय कारभार सांभाळताना डॉक्टर गेडाम यांची तारेवरची कसरत होत आहे. लगाम हे मुलचेरा तालुक्यातील मोठे गाव आहे. ग्रामीण भागात खासगी डॉक्टरांची संख्या अतिशय कमी आहे.

लगाम येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टरचे पद रिक्त आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर जावेद शेख यांची दीड वर्षांपूर्वी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तेव्हापासून प्रशासनाने एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती केली नाही. या रुग्णालयात केवळ बीएएमएस असलेले डॉ.संतोष गेडाम हे एकमेव डॉक्टर आहेत. बाह्य रुग्ण विभागात दर महिन्याला जवळपास १७०० ते २००० रुग्णांची तपासणी केली जाते. एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांची तपासणी करणे, भरती असलेल्या रुग्णांकडे लक्ष ठेवणे तसेच रुग्णालयाचा दैनंदिन प्रशासकीय कारभार सांभाळताना डॉक्टर गेडाम यांची तारेवरची कसरत होत आहे. लगाम हे मुलचेरा तालुक्यातील मोठे गाव आहे. ग्रामीण भागात खासगी डॉक्टरांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचारासाठी येतात. मात्र सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना अहेरी येथे वेळोवेळी रेफर करावे लागते. या रुग्णालयात येणारे रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत. या ठिकाणची रुग्णांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी एक एमबीबीएस डॉक्टर व एक महिला बीएएमएस डॉक्टरची नियुक्ती आवश्यक आहे.