अंकिसात प्रवासी निवाऱ्याचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST2021-01-10T04:28:01+5:302021-01-10T04:28:01+5:30
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना मंदिरात राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे येथे प्रवासी ...

अंकिसात प्रवासी निवाऱ्याचा अभाव
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना मंदिरात राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे येथे प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ऊन, वारा, थंडी, पाऊस यापासून प्रवाशांचे संरक्षण व्हावे, यासाठी शासनाच्या वतीने ‘बस तिथे प्रवासी निवारा’ ही संकल्पना राबवून ठिकठिकाणी प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम केले. अंकिसा गावाला तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखले जाते. परंतु महत्त्वाच्या गावातच प्रवासी निवारा नाही. सिरोंचा ते पातागुडम या मार्गावर प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. या वाहनांद्वारे नागरिक प्रवास करीत असतात. अंकिसा येथे अनेक गावचे प्रवासी थांबतात. परंतु त्यांना झाडे, दुसऱ्याची घरे तसेच मंदिराचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे येथे प्रवासी निवाऱ्याची गरज आहे.