धावत्या ट्रकमधून तार पडून कुरूडचा इसम जखमी

By Admin | Updated: December 20, 2014 01:33 IST2014-12-20T01:33:53+5:302014-12-20T01:33:53+5:30

तार भरून देसाईगंजवरून आरमोरीकडे जाणाऱ्या ट्रकमधला तार खाली पडून कुरूड गावचा एक इसम देसाईगंज येथे जखमी झाल्याची घटना ...

Kurud was injured in a stricken truck from a moving truck | धावत्या ट्रकमधून तार पडून कुरूडचा इसम जखमी

धावत्या ट्रकमधून तार पडून कुरूडचा इसम जखमी

देसाईगंज : तार भरून देसाईगंजवरून आरमोरीकडे जाणाऱ्या ट्रकमधला तार खाली पडून कुरूड गावचा एक इसम देसाईगंज येथे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. जखमी झालेल्या इसमाचे नाव विनायक ठाकरे (४०) रा. कुरूड असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सीजे ०४- जेबी १९६१ क्रमांकाचा ट्रक टायर बनविण्यासाठी लागणाऱ्या बारीक ताराचे बंडल घेऊन देसाईगंज आरमोरी मार्गावरून जात असताना सिंधी भवनाजवळ ट्रकमधून तार खाली कोसळला. यावेळी याच मार्गावरून कुरूड येथील विनायक ठाकरे हे जात होते. तार त्यांच्या अंगावर पडला व या अपघातात तारासह विनायक ठाकरे फरफट गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. या घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)

Web Title: Kurud was injured in a stricken truck from a moving truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.