कुरखेडात चक्काजाम
By Admin | Updated: August 27, 2015 01:40 IST2015-08-27T01:40:50+5:302015-08-27T01:40:50+5:30
जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी

कुरखेडात चक्काजाम
शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर : ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी
कुरखेडा : जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी वडसा-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय कडकडीत बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून ओबीसी आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्के करण्यात आले. पेसा अधिसूचनेंतर्गत जाचक अटीमुळे वर्ग ३ आणि ४ च्या नोकर भरतीतून इतर समाज बाद झाला आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात ओबीसी व इतर समाजात मोठी खदखद आहे. सत्ताधारी बदलले मात्र धोरण बदलले नाहीत. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची सत्ताधाऱ्यांना आठवन करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. यावेळी दिलेले आश्वासन पूर्ण करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा गगणभेदी घोषणा आंदोलकांनी दिल्या. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख आशिष काळे, पं. स. उपसभापती बबन बुद्धे, जि. प. सदस्य निरांजनी चंदेल, अशोक इंदूरकर, पं. स. सदस्य कविता दडमल, नरेंद्र तीरनकर, दिगांबर मानकर, मनोहर लांजेवार, गणेश तुलावी, पुंडलीक देशमुख, विजय पुस्तोडे, राहुल घोगरे, अमोल धाबेकर, सोनू भट्टड, भास्कर देशमुख, देवा गिरडकर, संजय देशमुख, पुरूषोत्तम तिरगम, देसाईगंज तालुकाप्रमुख नंदू चावला, वासुदेव बहेटवार, चंदू नागतोडे, अशोक कंगाले, रमेश कुथे, महादेव चंदनखेडे, कांता बावनकर, बोरकर, शारदा गाथाडे, चंदू नंदनवार, अनुसया सुरी, लता सहारे, गोलू धांडे, यादव नाकाडे, अज्जू सय्यद, आशिष चुधरी, दुर्गेश्वर देशमुख, दामू थोटे, रवी बिसनकर, श्रीकांत बावनकर व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)